अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२५)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शुक्र, शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी रात्रीपर्यंचा काळ संमिश्र आहे. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वाहने जपून चालवावीत. नंतरच्या दोन दिवसात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल व सहकार्‍यांची मदत मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल व छान मोबदलाही मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी धनस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी मंगळ(व), पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शुक्र, शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. नंतरचे दोन दिवस गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग या काळात शक्य आहेत. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन इ. गोष्टींशी आहे त्यांना ग्रहमान उत्तम आहे. जुने मित्र अचानक भेटतील. वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले कार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ(व), चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शुक्र, शनि, दशमस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीची असू शकते. तुमच्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. सप्ताह मध्यात जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. वरीष्ठ किंवा वडीलधारी मंडळींशी या काळात वाद होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवावे. सप्ताहाच्या अखेरीस धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवासयोग शक्य.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ(व), तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शुक्र, शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्या. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र दिवस अनुकूल आहे. याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील लोक, न्यायाधीश यांना तसेच कायदेविषयक कामांसाठी हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात व नंतर जोडीदाराची काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. नित्योपासनेत या काळात लक्ष लागणार नाही असे दिसते आहे मात्र हा काळ पुराण, अध्यात्म, ज्योतिष किंवा अन्य गूढ गोष्टींच्या अभ्यासास चांगला आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात शुक्र, शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घरात छान वातावरण असेल. बांधकाम व्यावसायिक तसेच इस्टेट एजंट यांना चांगल्या संधी चालून येतील. नंतरचे दोन दिवस चांगले आहेत. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंत कायदा/ न्यायव्यवस्थेशी संबंधीत असणार्‍यांना चांगला फायदा देणारा काळ ठरु शकेल. मात्र या काळात काहींना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतील. जोडीदाराशी वाद टाळावेत.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शुक्र, शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा/ आप्तेष्टांचा सहवास लाभेल. काही लाभ शक्य. त्यानंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. नशीबाची साथ मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. धार्मिक कार्यात सहभाग असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रलंबित प्रश्न असतील तर त्याला गती देवू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्य लाभदायक आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. एखादा नवीन विषय शिकायचा असेल तर किंवा कामाशी संबंधीत एखादा कोर्स करायचा असेल तर त्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शुक्र, शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व), दशमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. कलाकार, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शुक्र, शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व), नवमस्थानात मंगळ(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी संमिश्र ग्रहमान आहे. तब्येतीच्या तक्रारी जाणवत राहतील. तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी किंवा उष्णतेचे विकारही जाणवू शकतील. काळजी घ्यावी. नंतरचे दोन दिवस लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात व नंतर भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शुक्र, शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व), अष्टमस्थानी मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीसुध्दा हा कालावधी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र यादरम्यान जोखीम असलेली कामे करु नका. आणि वाहने सावकाश चालवा. मधूमेह असेल तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. सप्ताह मध्यात व नंतर भाग्यवर्धक ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. साहित्यिक, लेखक व कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. काही लाभही या काळात शक्य आहेत. भावंडांची खुशाली कळेल. प्रवासासाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शुक्र, शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानात मंगळ(व), नवमस्थानात केतू आणि लाभस्थानी बुध, व्ययस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. जुनी येणी वसूल होतील. मन समाधानी असेल. सप्ताह मध्यात व नंतर अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, दशमात बुध, लाभस्थानी सूर्य, आणि व्ययस्थानात प्लूटो, अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांचे सौख्य लाभेल. तुमच्या पराक्रमात वृध्दी होईल. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. मन प्रसन्न असेल. आप्तेष्टांच्या किंवा मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. काहींना प्रवासाचे किंवा परदेशगमनाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानी केतू, भाग्यात बुध, दशमात सूर्य, लाभस्थानात प्लूटो, आणि व्ययस्थानात शुक्र, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्र-बुध युती होईल व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्र-सूर्य युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. ४ तारखेला चंद्राची शनिशी युती होइल व सूर्याशी लाभयोग होईल. याचबरोबर सूर्याचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- छान आठवडा आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. काहींना धनलाभ शक्य आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासयोग आहेत. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मनासारखी खरेदी होऊ शकेल. खर्चही वाढतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)