अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात शुक्र, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवत रहातील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात समाधानकारक काम होऊ शकेल. वकील, आहारतज्ञ, केमिस्ट व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र घटना शक्य आहेत. वाहने जपून चालवा. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग या दरम्यान संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी धनस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी मंगळ(व), पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात शुक्र, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम होणार आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. मात्र या दरम्यान तुमचे आरोग्य सांभाळायला हवे. सप्ताह अखेरीस तुमच्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. प्रवास योगही शक्य.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ(व), चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. एखाद्या उत्सव/ समारंभात भाग घेण्याचे योग संभवतात. सोमवारी दुपारनंतर मंगळावारी रात्रीपर्यंत रागावर नियंत्रण ठेवावे. कोणाशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सर्दी किंवा थंडीचा त्रासही यादरम्यान होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना चांगला जाईल. मात्र यशासाठी झगडावे लागेल. अती आत्मविश्वास या काळात उपयोगाचा ठरणार नाही. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या काही समस्या जाणवतील. मात्र वकील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ(व), तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कला व कौशल्याला वाव मिळेल. काही लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचा पराक्रम तसेच आत्मविश्वास उंचावलेला असेल. या काळात केलेले प्रवास फयदेशीर ठरतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण उत्सव समारंभाचे रहाणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह अखेरीस संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान आहे. मन आनंदी राहील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी शुक्र, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे तसेच छान मेजवानीचे योग येतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू किंवा बक्षिस सुखावून टाकेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. वादग्रस्त लेखन यादरम्यान करु नका. लोकांचे विचित्र अनुभव शक्य. प्रवासातही काळजी घ्या. तब्येतीची काळजी घ्या. वादग्रस्त होईल असं लेखन सोशल मिडियावर करु नका सप्ताह अखेर परदेशप्रवासासाठी चांगली आहे. प्रॉपर्टीची कामे मात्र शक्यतो पुढे ढकला.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारची सकाळ छान खरेदीची ठरु शकेल. आवडत्या माणसांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना कालावधी चांगला आहे. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंतचा काळ उत्तम आहे. तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात काहींना धनलाभ शक्य. छान पार्टी किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येतील. कलाकारांसाठी हा काळ खूप चांगला आहे. सप्ताह अखेर लेखक/ खेळाडू यांना चांगली आहे. सहल किंवा प्रवासासाठीही काळ चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व), दशमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. अचानक धनलाभाचे योग शक्य. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी शुक्र, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व), नवमस्थानात मंगळ(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. आयात-निर्यातीच्या व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यार्‍यांना हा कालावधी विशेष आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण प्रसन्न असेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानात शुक्र, प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व), अष्टमस्थानी मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनोबल उत्तम राहील. प्रवास लाभदायी ठरतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारनंतर मंगळावारी रात्रीपर्यंत वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र खर्च वाढतील. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानात मंगळ(व), नवमस्थानात केतू आणि लाभस्थानी बुध, व्ययस्थानात सूर्य, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारची सकाळ अचानक धनलाभाची ठरु शकेल. कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. त्यानंतर मंगळावारी रात्रीपर्यंत उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा यादरम्यान पूर्ण होऊ शकेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. सप्ताह अखेरीस पुन्हा धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, दशमात बुध, लाभस्थानी सूर्य, आणि व्ययस्थानात शुक्र, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारची सकाळ लाभदायक ठरणार आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. कामात सुयश लाभेल. त्यानंतर मंगळावारी रात्रीपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. ज्योतिषी, मनसोपचारतज्ञ, सर्जन तसेच विमा व्यवसायिकांना हाच काळ जास्त फयदा मिळवून देऊ शकेल. सप्ताह मध्यात लांबच्या प्रवासाचे योग येऊ शकतील किंवा त्यासंबंधी विचार मनात घोळू लागतील. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. हितशत्रूंवरही लक्ष ठेवा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानी केतू, भाग्यात बुध, दशमात सूर्य, लाभस्थानात शुक्र, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २६ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल आणि शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. अध्यात्मिक उपासना करण्यास हा कालावधी चांगला आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)