अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२४)
Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), दशमस्थानात शुक्र, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सोमवार दुपारपर्यंत धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी किंवा आवडत्या लोकांशी संपर्क होईल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. एखादी दीर्घकाळाची महत्वाकांक्षा यादरम्यान पूर्ण होऊ शकेल. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. मात्र काही अनपेक्षित खर्च समोर उभे राहतील. सप्ताह मध्यानंतर मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबीक सौख्य मिळेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. काहींना धनलाभ शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ(व), पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), भाग्यस्थानात शुक्र, प्लूटो, दशमस्थानात शनि आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडू शकतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. गुरु/ गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मदतीमुळे काही कामे मार्गी लागू शकतील. धनलाभाचेही योग आहेत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तु संशोधक यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. परदेश प्रवासासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ(व), चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. वडीलधारी व्यक्तीशी वाद टाळावेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मात्र आपली मते दुसर्यांवर लादू नका. प्रवास या काळात करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. धनलाभ होईल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ(व), तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानात शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. ज्योतिषशास्त्र, पुराण, कुंडलिनी जागृती, अध्यात्म अशा गूढ विषयांच्या अभ्यासासाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास शक्य. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभही होतील. मात्र यादरम्यान मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही आजार असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह अखेरीस लाभदायक काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानी शुक्र, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र घटना शक्य आहेत. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहा. विद्यार्थ्यांना हा काळ प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. चांगल्या यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही याची जाणीव होईल. मात्र एखाद्या गोष्टीतील अचानक करावा लागलेला बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल. सप्ताहाचा शेवट लाभदायक घटनांचा ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. उपासनेत मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), पंचमस्थानात शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यातही सहभाग राहील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वकील/ फिजिकल फिटनेस या क्षेत्रात काम करणार्यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. सप्ताह मध्यात लाभदायक काळ आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर प्रतिकूल घटनांचा काळ असू शकतो. या काळात वाहने हळू चालवावीत. कोणतीही जोखीम या काळात महागात पडू शकते. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. काही लाभ शक्य आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
या सप्ताहासाठी उपासना: दत्त उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना एखादं बक्षिस, भेटवस्तू, बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कर्मचार्यांचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मधूमेह किंवा पोटाचे आजार असणार्यांनी मात्र काळाजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर व्यापार्यांना ग्रहमान अनुकूल असले तरी अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यातील उर्जा वाढलेली असेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी शुक्र, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. बिल्डर्स, इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. नविन विषय शिकण्यासाठी किंवा तुमच्या एखाद्या छंदाला जरुर वेळ द्या. ग्रहमानाची चांगली साथ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला आहे. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. संततिसौख्य लाभेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सप्ताह मध्यानंतर आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास या काळात शक्य. या काळात हितशत्रूंवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्याचा कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभही या काळात शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानी मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटी होऊ शकतील. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्याचा काळ आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर एखादा धनलाभ/ एखादी शाबासकीची मिळालेली थाप मिळाल्याने प्रसन्न असाल. प्रेमिकांना काळ उत्तम आहे. मुलांबद्दल किंवा जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे आज करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानात मंगळ(व), नवमस्थानात केतू आणि लाभस्थानी सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात मानसन्मान मिळेल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. लोकांच्या कौतुकाला पात्र व्हाल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग येतील.
या सप्ताहासाठी उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, दशमात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात शुक्र, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असू शकेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र एखाद्या गोष्टीची काळजी वाटत राहू शकेल. सप्ताह मध्य कौटुंबिक सौख्याचा आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. पाककलेत मन रमेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्या. वादग्रस्त लेखन या दरम्यान सोशल मिडियावर करु नका. अचानक काही खर्चही उद्भवू शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानी केतू, भाग्यात सूर्य, बुध(व), लाभस्थानात शुक्र, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व शुक्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. १३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी युती व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खरेदीसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. उपासनेत मन रमेल. सप्ताहाच्या मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सप्ताहाच्या मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. काही लाभ शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)