अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सोमवार सकाळपर्यंचा काळ संमिश्र आहे. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र या काळात जोखीम असलेली कामे करु नका. नंतरच्या दोन दिवसात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टांचे चीज होईल. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. लाभदायक काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. नंतरचे दोन दिवस गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग शक्य. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन, Data Analysis इ. गोष्टींशी आहे त्यांना उत्तम ग्रहमान आहे. जुने मित्र अचानक भेटतील. वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीची असू शकते. तुमच्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्य संमिश्र आहे. मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मात्र या दरम्यान रागावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराशी वाद संभवतात. काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय असेल तर जोडीदाराला कोणत्याही गोष्टीसाठी गृहीत धरु नका. व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्यानंतर अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम या काळात करु नका. वरीष्ठ किंवा वडीलधारी मंडळींशी या काळात वाद होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवावे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ, तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान उत्तम आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळेल. खेळाडूंना नेत्रदिपक यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात व नंतर जोडीदाराची काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर वाद टाळा. नित्योपासनेत या काळात लक्ष लागणार नाही असे दिसते आहे मात्र हा काळ पुराण, ज्योतिष किंवा अन्य गूढ गोष्टींच्या अभ्यासाससाठी चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी खर्च वाढतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. नंतरचे दोन दिवस चांगले आहेत. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. बांधकाम व्यावसायिक तसेच इस्टेट एजंट यांना चांगल्या संधी चालून येतील. सप्ताह मध्यात व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंत कायदा/ न्यायव्यवस्थेशी संबंधीत असणार्‍यांना चांगला फायदा देणारा काळ ठरु शकेल. मात्र या काळात काहींना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतील. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. जोडीदाराशी वाद टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा/ आप्तेष्टांचा सहवास लाभेल. काही लाभ शक्य आहेत. त्यानंतरचे दोन दिवस भाग्यकारक आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरु शकतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह मध्य व त्यानंतरचा कालावधी चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनासारख्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. एखादा कोर्स किंवा कामाशी संबंधीत काही शिक्षण घ्यायचं असेल तर ग्रहमान अनुकूल आहे. संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी आपले आरोग्य सांभाळा.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. कलाकार, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. कागदपत्रे मात्र योग्य व्यक्तीकडून तपासून घेऊनच व्यवहार करावेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानी मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. : या काळात महालक्ष्मीची उपासना करावी. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्य भाग्यवर्धक ठरेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. गायक व कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह अखेर प्रवासासाठी अनुकूल ठरु शकेल. भावंडांची खुशाली कळेल. वरीष्ठांची अनुकूलता राहील.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, नवमस्थानात केतू, लाभस्थानी सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. जुनी येणी वसूल होतील. मन समाधानी असेल. सप्ताह मध्यात व नंतरही अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, दशमात सूर्य, बुध, लाभस्थानी शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वरीष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. नोकरी/ व्यवसायातील लोक भरपूर कामात व्यस्त असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. घरात छान वातावरण असेल. आप्तेष्टांच्या किंवा मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टींपासून लांब रहा.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू, भाग्यात सूर्य, बुध, दशमात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती, गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राची बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ४ तारखेला बुधाचा गुरुशी प्रतीयोग, चंद्राची शुक्राशी युती व सूर्याचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुधाचा शनिशी केंद्रयोग व सूर्याचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- छान आठवडा आहे. सप्ताहात सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ कामावर खुश असतील. काहींना धनलाभ शक्य आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासयोग आहेत. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मनासारखी खरेदी होऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)