अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल. त्यांच्या काही समस्या असतील तर त्यासाठीही वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. थंडी/ सर्दीचा त्रास होऊ शकतो. योग्य ती काळजी घ्यावी. नोकरी करणार्‍यांनी कामात हलगर्जीपणा करु नका. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठीसुध्दा चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे त्रासदायक ठरू शकतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. काहींना मनसन्मान किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीला जपावे. आजारपण अंगावर काढू नका. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना मात्र अनुकूल काळ आहे. हितशत्रूंवर या काळात नजर ठेवणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. प्रवास योग शक्य.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नातेवाईक किंवा शेजारी यांच्याशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. या काळात सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही काळजी घ्या. सप्ताह मध्यात रागावर नियंत्रण ठेवा. घरातली शांतता बिघडू देऊ नका. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. आईला तब्येतीसंबंधी काही त्रास असतील तर दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या मध्यानंतर ग्रहमानात सुधारणा होईल. विद्यार्थी, कलाकार तसेच प्रेमिकांना अनुकूल ग्रहमान आहे. मुलांकडून चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टोत्पत्तीस येण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ, तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस प्रिय घटनांचा असेल. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. नंतरचे दोन दिवस प्रवासाचे योग येऊ शकतात. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. सप्ताह मध्यानंतर हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. संततिसौख्य लाभेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मस्त जाणार आहे. मन आनंदी असेल. सोमवार ते गुरुवार कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. नविन वास्तू खरेदी/ विक्री किंवा गृहसजावटीसाठी लागणार्‍या वस्तु खरेदीसाठी अनुकुल काळ आहे. कलाकारांना, वक्त्यांना संपूर्ण सप्ताह चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. प्रवास फ़ायदेशीर ठरु शकतील. आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे मात्र बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. नंतरचे दोन दिवस आत्मविश्वास वाढविणारे असतील. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कवी, लेखक यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही शक्य आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. घरात एखादी पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. नंतरच्या दोन दिवसांत पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र टाळावी. ज्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे त्यांना चांगला फायदा या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. सप्ताह अखेरीस धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस छान असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. मन प्रसन्न राहील. नंतरचे दोन दिवस धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. बेकायदा गोष्टी मात्र या काळात टाळाव्या. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानी मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला व सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळणे या काळात क्ठीण आहे. बेकायदा गोष्टी या काळात कटाक्षाने टाळाव्यात. व्यावसयिकांना अचानक काही खर्च सामोरे येऊ शकतात. सप्ताह मध्यानंतर ग्रहस्थिती अनुकूल होणार आहे, मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. धनलाभ होईल. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, नवमस्थानात केतू, लाभस्थानी सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस कंटाळवाणा किंवा अडथळ्याचा असू शकतो. प्रवासात काळजी घ्या. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. मात्र याच काळात अचानक धनलाभाचेही योग शक्य आहेत. नंतरचे दोन दिवस उत्तम असतील. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. वरीष्ठ खुष असतील. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. नृत्यकलाकारांना मात्र यशदायक काळ आहे. सप्ताह अखेरीस धनलाभ होतील. मित्रांच्या भेटी शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, दशमात सूर्य, बुध, लाभस्थानी शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू, भाग्यात सूर्य, बुध, दशमात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगला काळ असेल. मात्र याच काळात तब्येतीची काळजी मात्र जरुर घ्यावी. हितशत्रू जर कोणी असतील तर त्यांच्यावरही लक्ष ठेवा. सप्ताह मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसायिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य. अचानक एखादी मानाची जबाबदारी अंगावर येऊन पडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरतील.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)