अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२४)
Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. रविवारी काही लाभ होण्याची शक्यता आहे. घरात छान वातावरण असेल. तुमच्या संभाषण कौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. गायक व वक्त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. त्यानंतर सोमवार व मंगळवार हे दोन दिवस भावंडांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होऊ देऊ नका. या काळात प्रवासही शक्यतो टाळलेलेच बरे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेली सर्वच कामे टाळावीत. सर्जन, मानसोपचारतज्ञ, विमा व्यवसायिक तसेच ज्य़ोतिषी यांना मात्र हा कालावधी अनुकूल ठरणार आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. मात्र अचानक धनलाभाचे योगही शक्य आहेत. नंतर मात्र सप्ताह मस्त जाणार आहे. सोमवार व मंगळवार हे दोन दिवस मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यातही लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी संपर्क होईल. लेखक, प्रकाशक यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मनासारखी खरेदी होईल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. नृत्यकलेशी संबंधितांना मात्र हा कालावधी छान जाईल. पूर्वी केलेला एखादा खर्च आता अचानक लाभ देऊन जाईल. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. आपले आरोग्य सांभाळा. कोणालाही विनाकारण दिलेला सल्ला या काळात त्रासदायक ठरु शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे कोणी हितशत्रू असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. सप्ताह मध्यात मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. धनलाभाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वाद टाळा. नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. मात्र लोकांशी व्यवहार करतांना तसेच सोशल मिडियावर काही शेअर करतांना या दरम्यान काळजी घ्या.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ, तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण आनंदी असेल. हातातली कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे तुमचा कल असेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सप्ताह अखेरीस आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक योग आहेत. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने प्रसन्न असतील. सप्ताहाचा मध्य कार्यपूर्तीचा ठरु शकेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. लोकांचे सहकार्य मिळेल. एखादी महत्वाकांक्षा यादरम्यान पूर्ण होऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतील. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागून राहील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. प्रवास योग आहेत. तुमच्या उत्तम नियोजन कौशल्यामुळे काही कामे मार्गी लावू शकाल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतूनही फायदा होऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होऊ शकेल. यादरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारी जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सोमवार व मंगळवारी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या बेत मनात येऊ शकतात. जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. कलाकारांना तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. वेळ मजेत जाईल. जुनी येणी वसूल होतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनही चांगला कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस विमाप्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांना अनुकूल आहेत. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. दुसर्यांच्या चुका काढणं किंवा इतरांना टोचून बोलणं या काळात महागात पडू शकेल. राजकारणी लोकांना मात्र हाच कालावधी जास्त अनुकूल ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची बहाल मर्जी राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानी मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. मंगळवार ते शुक्रवार हे चार दिवस संमिश्र आहेत. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराला ग्रुहीत धरणं महागात पडू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी भागीदारीतील महत्वाचे निर्णय पुढे ढकलणे हिताचे ठरेल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. जोखीम असलेली कामे टाळा. अध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र हा कालावधी चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, नवमस्थानात केतू, लाभस्थानी सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र आहे. तुमच्या आवडत्या कलेसाठी किंवा छंदासाठी जरुर वेळ द्या. धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. मात्र विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगला. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, दशमात सूर्य, बुध, लाभस्थानी शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. मौज-मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना खूप अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू, भाग्यात सूर्य, बुध, दशमात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी व बुधाचा गुरुशी प्रतियोग होईल. २० तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २२ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
करावा.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थी, लेखक व कलाकारांनासुध्दा हा कालावधी खूप चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी शाबासकी किंवा कौतुकाची मिळालेली थाप सुखावून टाकेल. धनलाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)