अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, top astrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग येऊ शकतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. परदेशाशी कार्यक्षेत्राचा संबंध असणारे व नृत्यकलेशी संबंधित असणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. मात्र दैनंदिन कामात काही अडचणी जाणवतील. काही चिंताही असतील. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबीक सौख्य मिळेल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात भाग्यवृध्दी करणारे योग येतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्र व कायद्याच्या क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींचे सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यानंतर काही खर्च अचानक समोर येतील. जोखीम असलेली कामे यादरम्यान करू नका. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाच्या अखेरीस तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा. सोमवारी महादेवाचे दर्शन घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाचे पहिले दोन दिवस संमिश्र आहेत. कोणतीही जोखीम घेणे या काळात महागाचे ठरू शकेल. वाहने जपून चालवा. कामात कुचराई किंवा दिरंगाई होऊ देऊ नका. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण असू द्या तसेच वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे कोणतेही वर्तन या काळात टाळावे. सप्ताह मध्यात हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणाल. सप्ताह मध्यानंतर आर्थिक लाभ होतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग यादरम्यान शक्य आहे. शनिवारी जोडीदाराला
एखादी छानशी भेटवस्तु देऊन खुश करु शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला दोन दिवस तुमच्या घरात आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यानंतर सप्ताह मध्य न्यायक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना चांगला आहे. आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन गुंतलेले असेल. सप्ताह अखेरीस चांगला काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. काही लाभही होतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी काळ अनुकूल आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. शनिवारी एखाद्या मित्राचा किंवा परीचिताचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होऊ देऊ नका. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्या. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना कालावधी फ़ारसा चांगला नाही. व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतील. इतिहासकार, ज्योतिषी, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर वाहने सावकाश चालवावीत. प्रवासात सर्व प्रकारची काळजी घ्यावी. बेकायदा गोष्टी टाळाव्या. अचानक काही खर्चही या काळात उद्भवू शकतात. सप्ताहाचा शेवट सुखद ठरु शकेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. काही लाभ होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगली ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढण्याची शक्यता आहे त्याकडे दुर्लक्ष नको. तुमच्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्यात ग्रहस्थिती चांगली असेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र या काळात वाहने हळू चालवावीत. शनिवारी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानात बुध, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. धनलाभाचे योग येतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. मधूमेह असलेल्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चैन, मौजमजा यांनी होऊ शकेल. मन प्रसन्न असेल. घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य लाभदायक आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. खेळाडू व विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर कायदा व वैद्यक शास्त्राशी निगडीत व्यावसायिकांना फायदेशीर ग्रहमान आहे. मात्र आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्याचा कालावधी आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानी मंगळ, दशमस्थानात केतू, लाभस्थानी सूर्य आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास करणार असाल तर ते लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्या. सप्ताह मध्यानंतर संततीचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. वाहने सावकाश चालवावीत. खेळाडूंनी दुखापत होऊ नये म्हणून स्वत:ची योग्य ती काळजी या काळात घेणे आवश्यक आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा. सोमवारी महादेवाचे दर्शन घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, नवमस्थानात केतू, दशमात सूर्य, लाभस्थानी बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कामात सुयश लाभेल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. लेखक, वक्ते व कवी चांगले काम झाल्याने आनंदात असतील. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. मनोबल वाढविणारी घटना घडेल, प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. विवाहोत्सुकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, भाग्यात सूर्य, दशमात बुध, लाभस्थानी शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. गृहसौख्य लाभेल. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून यादरम्यान फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग असतील. मन आनंदी असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोग या काळात शक्य. छान छान पदार्थ बनवणे तसेच वेगवेगळ्या हॉटेलला भेटी देऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेणे तुम्हाला मनस्वी आवडते. तसाच काहीसा अनुभव या काळात येणार आहे. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. मात्र वादग्रस्त होईल असं लेखन सोशल मिडियावर करु नका. भावंडांशी वाद होणार नाही याचीही काळजी यादरम्यान घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यात बुध, दशमात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्य वृश्चिक राशित प्रवेश करेल व चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छान खरेदी होईल. खर्चही वाढणार आहेत. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा कालावधी खूप महत्वाचा ठरणार आहे. सप्ताह मध्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला तुम्हाला जाणवेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. शनिवारी तुम्हाला प्रसिध्दी मिळण्याचे योग आहेत. याचबरोबर गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे किंवा त्यांच्याशी संपर्क होण्याचे योगही शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गुरुतत्वाची सेवा करावी. (ज्यांनी दत्तगुरु/ स्वामी समर्थ/ गजानन महाराज/ साईबाबा अशा विभूतींना गुरु मानलं असेल त्यांनी या काळात त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे).
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)