अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२४)
Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध, केतू, सप्तमस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंत तुमचा आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी संभवतील. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच कालावधी विमा व्यावसायिक व मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे. याच काळात काहींना भविष्यदर्शक सूचक स्वप्न पडू शकतील. सप्ताह मध्य लाभ देणारा आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेर कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटनांची नांदी ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. कामे मार्गी लागतील. धनलाभाचेही योग आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, केतू, षष्ठस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. सप्ताह मध्य संमिश्र असेल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे बेत ठरवाल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हाणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, केतू, पंचमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अॅसिडीटी/ मायग्रेन किंवा पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. मात्र हाच काळ वैद्यकीय क्षेत्रातील लोक, वकील, जीम ट्रेनर तसेच आहारतज्ञ यांना चांगला लाभ मिळवून देईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. जोखीम असलेली कामे या काळात टाळलेलीच बरी.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, केतू, चतुर्थस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस गृहसौख्याचा असणार आहे. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. संततीशी वाद टाळा. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. परदेशात शिकायला ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी काही सकारात्मक घटना घडतील किंवा काही उपयुक्त माहीती मिळू शकेल. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. धनलाभाचेही योग आहेत. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्रे अती दगदग टाळावी. तब्येतीची काळजी घेणेही गरजेचे राहील. सप्ताह अखेर तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. विशेषत: जोडीदाराशी वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीचीही काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, बुध, केतू, तृतीयस्थानी शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कला/ कौशल्याला वाव मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. आत्मविश्वास वाढेल. काहींना प्रवास योग आहेत. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतील. वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे. तब्येतीची मात्र यदरम्यान काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, केतू, धनस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. लाभ होतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्यानंतर घरात छान वातावरण असेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार फायदेशीर ठरु शकतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन प्रसन्न असेल. नंतरचे दोन दिवस आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताह मध्यात चांगले ग्रहमान आहे. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल.. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध, केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. खर्चही वाढणार आहेत. मनोरंजनाकडे कल राहील. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. यादरम्यान वाहने सावकाश चालवा. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासयोग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि लाभस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभही होतील. त्या नंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. दैनंदिन कामे रेंगाळतील. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात काही छान अनुभव येतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुरुवारी तब्येतीची काळजी घ्यावी. कोणाशीही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, नवमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि दशमात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. मंगळवारी तब्येतीची काळजी घ्या. वाद टाळा. वरीष्ठांशी जमवून घेतल्यासच तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह मध्यात मनाजोगती खरेदी होऊ शकेल. काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्यांना तसेच नृत्यकलेशी संबंधितांना खूप चांगला कालावधी आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह अखेरीस आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, केतू, भाग्यात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. नोकरीत किंवा व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. व्यवसायिकांना भरपूर लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी काही अचानक खर्च करावे लागू शकतील. जोखीम असलेली कामे टाळावीत. मात्र एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा या काळात शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानी सूर्य, बुध, केतू, अष्टमस्थानात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला बुधाचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग आणि गुरुशी प्रतियोग होईल याचबरोबर बुधाचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ११ तारखेला शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. ज्यांचा संशोधनकार्याशी संबंध आहे अशा लोकांना या काळात काही लाभही होऊ शकतील. नंतरचे दोन दिवस भाग्यवृध्दीकारक असतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. काही लाभ होतील मात्र कोणाच्या तरी विचित्र वागण्याचा त्रास या दरम्यान संभवतो.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)