अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, केतू, सप्तमस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ मजेत जाईल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभाचे योग आहेत. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटी शक्य. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना विशेष चांगला काळ आहे. प्रवासयोग या काळात शक्य. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, धनस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, केतू, षष्ठस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढलेला असेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य लाभदायक घटनांचा आहे. आर्थिक सुयश लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. मात्र यादरम्यान तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक काळ आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. लेखक व प्रकाशकांना चांगले ग्रहमान आहे. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवास योग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, केतू, पंचमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान प्रतिकूल आहे. काही खर्च अचानकपणे सामोरे येऊ शकतील. मुलांसाठी काही खरेदी कराल. गुंतवणूकीसाठीही ग्रहमान साथ देईल. मात्र कोणतीही गुंतवणूक करतांना तज्ञ व्यक्तीचा जरुर घ्या. सप्ताहाच्या मध्यामधे संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी. मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. या काळात प्रवास करणार असाल तर योग्य ती काळजी घ्या. सप्ताहाच्या अखेरीस घरात छान वातावरण असेल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, केतू, चतुर्थस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. घरातही छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. मात्र काही अनपेक्षित खर्चही करावे लागतील तसेच या दरम्यान बेकायदा गोष्टी टाळाव्या. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी सूर्य, केतू, तृतीयस्थानी शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकते. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. एखादे बक्षीस किंवा शाबासकीची एखादी थाप सुखावून टाकेल. एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करणे टाळा. परदेशाशी संबंधीत काही कामे असतील तर त्यांना गती देऊ शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, केतू, धनस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात बुध ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहे. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ईन्शुरन्सचे काम करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे. ज्योतिष, मानसशास्त्र हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. प्रवास लाभदायक ठरु शकतील. सप्ताहाच्या शेवटी केलेल्या कामाचं, मेहनतीचं चीज़ होईल. लाभही होऊ शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर या काळात फ़ायद्याचे प्रमाण वाढेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. अपघातभय आहे. याउलट काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. काही धनलाभही या काळात अपेक्षित आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी संध्याकाळपर्यंत लाभदायक ग्रहमान आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्‍यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. ज्योतिष, वास्तू, रेकी अशा गूढ विषयांच्या अभ्यासासाठी अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध आणि नवमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना लाभदायक काळ आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. या काळात मुलांशी संवाद साधा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्या. सप्ताह मध्य आरोग्याच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. नोकरदार व्यक्तींनी वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुमच्या हितशत्रूंवर या काळात लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणा‍र्‍यांसाठी चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध अष्टमस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. घरात प्रसन्नता असेल. प्रॉपर्टीची कामे करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताहाचा मध्य लाभदायक आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना कमी कष्टात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्या. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध सप्तमस्थानी शुक्र, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुध कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २४ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २५ तारखेला चंद्र व गुरु यांची युती होईल. २७ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी संध्याकाळपर्यंत गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. मात्र वादग्रस्त होईल असं लेखन या दरम्यान तुम्ही सोशल मिडियावर करु नका. बुधवारी रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. सप्ताहाच्या मध्यानंतर घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)