अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२४)
Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंतचा काळ लाभदायक आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. वाहने जपून चालवा. कोणतेही जोखीम सध्या नको. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, शास्त्रज्ञ, सिआयडी/ खाजगी गुप्तहेर यांच्यासाठी मात्र हाच काळ चांगला असेल. काहींना अचानक धनलाभ या काळात शक्य होईल. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभ होतील सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व सुयश लाभेल. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, धनस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंत आरोग्याच्या समस्या जाणवत रहातील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. धनलाभ होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. मात्र हा कालावधी काहींना अचानक धनलाभ देऊ शकेल तर काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट धार्मिक गॊष्टींसाठी चांगला आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस मिळणे असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकूल आहेत. मात्र अॅसिडिटी/ मायग्रेन तसेच पोटासंबंधी काही त्रास असतील तर आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताहाचा मध्य संमिश्र असेल. संततीशी वाद टाळा. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. उपासनेसाठी किंवा धार्मिक गोष्टींसाठी मात्र हा कालावधी चांगला ठरणार आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानी शुक्र, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. कला/ कौशल्याला वाव मिळेल. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभही होतील. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींचा/ मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सप्ताहाच्या शेवटी आरोग्य सांभाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात उत्तम घटनांनी होऊ शकेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. निरनिराळे लाभ होतील. सप्ताह मध्य उत्तम आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताह अखेर मनाला दिलासा देणार्या घटना घडतील. विद्यार्थांना यश मिळेल मात्र थोडे कष्ट अधिक घ्यावे लागतील. नवीन गुंतवणूक करत असाल तर पुरेशी काळजी घेणे अपेक्षित आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. आत्मविश्वास वाढीला लावणारे ग्रहमान आहे. लाभ होतील. कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. प्रेमिकांना काही सुखद अनुभव या काळात येतील. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. मात्र वादग्रस्त होईल असं लेखन सोशल मिडियावर या काळात करु नका. वाहनेही सावकाश चालवा. सप्ताहाच्या अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंत छान खरेदी होऊ शकेल. खर्च या काळात वाढणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदाही यादरम्यान शक्य. मनोरंजनाकडे कल राहील. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. विवाहोत्सूकांना चांगले स्थळ यादरम्यान चालून येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योग शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. लोकांचे सहकार्य मिळेल. धनलाभाचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यात कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागेल. खरेदीचे योग आहेत. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर कोणाशी शत्रूत्व निर्माण होईल असं वर्तन टाळा. आरोग्याच्या काही तक्रारी यादरम्यान जाणवू शकतील. नोकरीच्या शोधात असणार्यांना मात्र काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सप्ताहाच्या शेवटी डोळे किंवा दात यांच्या काही समस्या जाणवू शकतील. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्यात.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध आणि नवमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सोमवार दुपारपर्यंतचा काळ उत्तम असेल. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायिकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. मन प्रसन्न राहील. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर कालावधी अनुकूल आहे. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. काही लाभ होतील. मात्र या काळात एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन रमेल. यादरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. नृत्यकलाकारांसाठी छान ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध अष्टमस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात भरपूर व चांगले काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे सुशोभीकरण किंवा दुरुस्तीसाठी वेळ काढाल. सप्ताह अखेरीस जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध सप्तमस्थानी शुक्र, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीची मदत किंवा मार्गदर्शन या काळात मिळू शकेल. धनलाभ अपेक्षित असेल तर त्यासाठी थोडे अधिक परीश्रम करावे लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. सप्ताहाच्या शेवटी खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)