अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. मौजमजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्य वकील, फार्मासिस्ट व वैद्यकीय क्षेत्रातील लोक यांच्यासाठी चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना काही नवीन संधी चालून येऊ शकतील. मात्र यादरम्यान तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. जोडीदाराशी वाद टाळा. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांशी संवाद साधाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायिकांना चांगले लाभ होऊ शकतील. काहीना प्रवास योग्य शक्य आहेत. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व कलाकार यांच्यासाठी चांगला आहे. काहींना बक्षीस, प्रशंसा किंवा मानसन्मान मिळेल. प्रेमिकांना लग्न करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट नोकरदारांसाठी चांगला असेल. शत्रूनाश होईल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत बढती किंवा चांगल्या ठिकाणी बदली होऊ शकेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ होतील. सप्ताह मध्यानंतर एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग शक्य आहेत. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावून टाकेल. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिकांना काळ अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी शुक्र, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. मन आनंदी असेल. घरातील वातावरणही प्रसन्न राहील. धनलाभाची शक्यता आहे. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन नवग्रहांचे दर्शन घावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानी शुक्र, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु, हर्षल, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवार सकाळ खरेदीसाठी चांगली आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ घरगुती गोष्टींसाठी अनुकूल आहे. घरासंबंधी काही कामे प्रलंबीत असतील तर ती आता उरकून घेऊ शकाल. काही भाग्यवर्धक घटनाही घडू शकतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात धनलाभाचे योग संभवतात. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीचे/ संपर्काचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी लेखक व साहित्यिक यांना ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस छान मस्त असेल. आवडती माणसं भेटतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. त्यानंतर मंगळवार रातीपर्यंत कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चही वाढतील. प्रवासात असाल तर आपल्या चीजवस्तू सांभाळा. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह अखेर तुमचा आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. कलाकार विशेषत: यायकांसाठी यशदायक काळ आहे. मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काही धनलाभही होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना वरीष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. धनलाभ होतील. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने विशेष आनंदात असतील. आवडत्या लोकांच्या सहवासात रहाण्याचे योग येतील. काही महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकतील. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशी नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात.
या सप्ताहासाठी उपासना: गणपतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, नवमस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करीत असाल तर वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी शक्य आहेत. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. चैन करण्याकडे कल असेल. कलाकारांना व परदेशाशी ज्यांचा कामाचा संबंध असतो त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र आहे. महत्वाचे निर्णय शाक्यतो पुढे ढकला. ध्यानधारणा, मेडिटेशन, कुंडलिनी जागृती, रेकी अशा गूढ विषयांचे आकर्षण वाटेल. त्यानंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. सप्ताह मध्यात अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानी बुध, अष्टमस्थानात सूर्य आणि नवमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवार लाभदायक आहे. आवडत्या लोकांबरोबर वेळ चांगला व्यतीत होईल. त्यानंतरचे दोन दिवस अचानक धनलाभाचे ठरु शकतील. ज्योतिषी, सर्जन तसेच विमा व्यावसायिकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक रिकाम्या झालेल्या एखाद्या जागेवर नेमणूक होणे शक्य आहे. मात्र या काळात जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. उपासनेसाठीही हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. कौटुंबिक सौख्य लाभेल. सप्ताहाचा शेवट उत्तम असेल. मनासारखं काम होईल. वरीष्ठ खूष असतील. तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतील व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. मात्र जोखीम असलेली कामे या काळात करु नका. तब्येतीची काळजी घेणे या दरम्यान आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. भाग्यवृध्दी होईल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानी शुक्र, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा गुरु व मंगळाशी लाभयोग तर बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व शनिशी प्रतियोग होईल. ४ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल आणि बुध सिंह राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस छान असेल. लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. वडीलधारी मंडळींकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील. नंतर मंगळवारपर्यंतचा काळ संमिश्र असेल. फ़िजिकल फ़िटनेसच्या व वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. कोणाशीही शत्रूत्व निर्माण होईल असं वर्तन या काळात प्रकर्षाने टाळा. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदाराबरोबरच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे या काळात खूप महत्वाचे ठरेल. सप्ताहाच्या शेवटी मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांना चांगला कालावधी आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)