अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात बुध(व), पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात शुक्र, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. मात्र रविवार संध्याकाळ ते सोमवारी दुपारपर्यंतच्या काळात बोलण्यावर संयम ठेवावा. लोक दुखावले जाऊ शकतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटीचे योग येतील. प्रवास फायदेशीर ठरू शकतील. ब्लॉगर्स, कलाकार व वक्त्यांना ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. मन आनंदी असेल. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. मन आनंदी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, तृतीयस्थानी बुध(व), चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात शुक्र, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी जुनी येणी/ उधारी वसूल होऊ शकेल. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगला अनुभव येण्याची शक्यता आहे. छान खरेदी करु शकाल. नंतरचे दोन दिवस लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. गृहसौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग शक्य आहेत. कवी, लेखक यांच्यासाठी हा कालावधी मस्त असेल. मनासारखं काव्य/ लेखन घडेल. तुमच्या उत्तम नियोजनामुळे महत्वाची कामे पार पाडाल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध(व), तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात शुक्र, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या भेटीचे योग येतील. खिशात पैसे भरपूर खुळखुळत असल्याने चांगली खरेदी कराल. मौज-मजा करण्याकडे कल असेल. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी हा कालावधी खूप चांगला आहे. काही चांगले अनुभव या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी संभाषण कौशल्याच्या जोरावर काही कामे मार्गी लावू शकाल. काही लाभ या काळात शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध(व), धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी शुक्र, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात मंगळ, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात वरीष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. एखादी मागणी असेल तर त्यांच्याकडे आता शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने आनंदी असाल. आवडत्या लोकांची भेट होईल. काही लाभही होतील. सप्ताह मध्यानंतर पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. सप्ताहाच्या शेवटी दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्या कमी होतील.
या सप्ताहासाठी उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानी शुक्र, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक काळ आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सासूरवाडीच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. वरीष्ठ खुश असतील. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग येतील. लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, लाभस्थानात बुध(व) आणि व्ययस्थानात सूर्य ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारी वाहने जपून चालवावीत. लेखक/ ब्लॉगर्स यांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. नंतरचे दोन दिवस उपासना करण्यार्‍यांना चांगले आहेत. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून अष्टमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, दशमस्थानात बुध(व), लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. काही लाभही होऊ शकतील. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र असणार आहेत. वाहने जपून चालवा. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांच्यासाठी मात्र हा काळ अनुकूल घटनांचा ठरणार आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास शक्य आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, नवमस्थानात बुध(व), दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीचा काळ नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना सुसंधी देणारा ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र या काळात डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना कालावधी चांगला आहे. काही लाभही संभवतात. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. काहींना सूचक स्वप्न पडतील. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकीत करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, अष्टमस्थानात बुध(व), भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांना छान कालावधी आहे. उपासनेसाठीही हा कालावधी चांगला आहे. मात्र रविवार संध्याकाळ ते सोमवारी दुपारपर्यंतच्या काळात तब्येतीची काळजी घ्या. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ व केमिस्ट यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करायचा असेल तर हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळा. सप्ताहाचा शेवट मानसिक चिंतेचा असू शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, सप्तमस्थानी बुध(व), अष्टमस्थानात सूर्य आणि नवमस्थानात शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आनंद देणारा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कलेच्या क्षेत्रात यश व मानसन्मान मिळेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. सप्ताह मध्यात जिद्द वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वैद्यकीय व्यवसायातील लोक, केमिस्ट यांना संततीबद्दल चांगली बातमी कळेल. ग्रहमान अनुकूल आहे. मात्र आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, षष्ठस्थानात बुध(व), सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात शुक्र, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या पराक्रमात वृध्दी करणारे ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. या काळात केलेले प्रवास फायदेशीर ठरु शकतील. सप्ताहाच्या मध्यात घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. वरीष्ठांची मर्जी राहिल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, पंचमस्थानात बुध(व), षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानी शुक्र, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २६ तारखेला मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. २७ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती तर बुधाशी लाभयोग होईल. २८ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभ होऊ शकेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. गृहसौख्य लाभेल. उपासनेत मन रमेल. सप्ताह मध्यात भावंडांशी भेट होईल किंबा त्यांच्याशी संपर्क साधाल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोग शक्य. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या नवीन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)