अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध(व), शुक्र, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा काळ लाभदायक आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. वाहने जपून चालवावीत. कोणतेही जोखीम सध्या नको. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी मात्र हा काळ चांगला असेल. काहींना अचानक धनलाभ शक्य. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग येतील. वरीष्ठांची मर्जी राहिल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आर्थिक लाभ शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध(व), शुक्र, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत आरोग्याच्या काही समस्या जाणवत रहातील. गुप्तशत्रूंवर नजर ठेवावी. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवावीत. मात्र हा कालावधी काहींना अचानक धनलाभ देऊ शकेल तर काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट धार्मिक गॊष्टींसाठी चांगला असेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी बुध(व), शुक्र, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस मिळणे असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस परदेशात नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकूल आहेत. मात्र अॅसिडिटी/ पोटासंबंधी ज्यांना काही त्रास असतील त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर आपल्या आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानी बुध(व), शुक्र, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात मंगळ, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात भाग घ्याल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस, पदोन्नती, धनलाभ किंवा वरीष्ठांकडून मिळालेली शाबासकी सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध(व), शुक्र, धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. कलाकौशल्याला वाव मिळेल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्येतीची काळजी घ्या आणि जोडीदाराबरोबर वाद टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध(व), शुक्र ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात चांगल्या घटनांनी होईल. काहींना लाभ होऊ शकतील. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यात नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर शेअर केलेल्या एखाद्या पोस्टमुळे प्रसिध्दी किंवा काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह अखेर संमिश्र असेल. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून अष्टमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध(व), शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. धनलाभ होतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. एखादी खरेदी मनाला आनंद देईल. मनोरंजनाकडे मनाचा कल राहील. ज्यांना परदेशगमन करायचं आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. सप्ताहाच्या अखेरीस आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. खेळाडूंना आजचा दिवस विशेष यशाचा असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध(व), शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. मात्र खर्चही या काळात वाढणार आहेत. घराच्या सुशोभीकरणासाठी किंवा दुरुस्तीसाठी एखादा खर्च करावा लागू शकेल. धार्मिक गोष्टींसाठी चांगलं ग्रहमान आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. नृत्यकलेशी संबंधीत असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात व नंतर तुमच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणीतरी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. अॅसिडिटी किंवा पोटाचे काही आजार असतील तर तब्येतीला जपा. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी ओळखीतून चालून येतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध(व), शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आर्थिक सुयश लाभेल. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. या काळात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. सप्ताह मध्यात व नंतर संततीसाठी काही खर्च होतील. तब्येतीची काळजी घ्या. उष्णतेसंबंधीत काही त्रास यादरम्यान शक्य आहेत. अध्यात्म मार्गातील लोकांसाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही शक्य आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध(व), शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. अशा वेळेस पूर्ण जागरुक असणे आवश्यक आहे. संशोधक, डेटा अॅनालिस्ट, इतिहासकार, ज्योतिषी व राजकारणी यांना अनुलूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादा छंद किंवा एखादी हौस पुरवून घ्याल.
सप्ताह मध्यानंतर उधारी वसूल होईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होतील. कौटुंबीक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध(व), शुक्र, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग या काळात शक्य. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात भरपूर व चांगले काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. लांबच्या प्रवासाचे बेत मनात घोळत रहातील. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांशी/ नातेवाईकांशी संपर्क साधाल. एखाद्या मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस अचानक काही खर्च करावे लागतील. जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध(व), शुक्र, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी प्रतियोग तसेच मंगळ व गुरु यांची युती होईल. १६ तारखेला शनिचा चंद्राशी लाभयोग तर मंगळाशी केंद्रयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धनलाभ अपेक्षित असतील तर त्यासाठी २/३ दिवस थांबावे लागेल. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)