अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ जुलै ते २७ जुलै २०२४)
Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- पूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे किंवा संपर्काचे योग आहेत. सप्ताह अखेरीस मनासारखी खरेदी कराल. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा या काळात शक्य होईल. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. आयात-निर्यातीच्या क्षेत्रात काम करणार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. लोकांचे सहकार्य मिळेल. उपासनेत मन लागेल. प्रवास लाभदायक ठरतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम होईल. यशाचं प्रमाण वाढल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठसुध्दा तुमच्या कामावर खुश असतील. वरीष्ठांकडून काही मागण्या असतील तर आता त्यांच्याकडे शब्द टाकण्यासाठी ही वेळ योग्य आहे. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ होऊ शकतो. एखद्या मित्र किंवा नातेवाईकाशी झालेला संपर्क मनाला उभारी देईल. एखादी अपूर्ण राहिलेली महत्वाकांक्षा थोड्याशा प्रयत्नात पूर्ण होऊ शकेल. काहींना परदेशगमनाचे योग येतील.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात तितकीशी चांगली असणार नाही. वाहने जपून चालवा. जोखीम असलेल्या व्यवहारांपासून लांब रहा. सप्ताहाच्या सुरूवातीला मनाविरुध्द घटना शक्य आहेत. नियोजित कामांमध्ये दीरंगाई होईल. मनात येणार्या निराशाजनक विचारांना बाजूला ठेवा. या काळात केलेली ध्यानधरणा किंवा मेडीटेशन नक्की उपयोगी पडेल. हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ यांना मात्र अनुकूल आहे. सप्ताह मध्यात वडीलधारी व्यक्तींशी वाद टाळावेत. तुमची धार्मिक मते वेगळी असतील तर ती इतरांवर लादू नका. सप्ताह अखेरीस संमिश्र काळ आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यापार्यांना ग्रहमान अनुकूल आहे मात्र अती दगदग त्रासाची ठरु शकेल. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, शुक्र, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात मंगळ, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह थोडासा प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदाराच्या
तब्येतीबाबत काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी भागीदाराला कोणत्याही बाबतीत गृहीत धरु नका. सर्व व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. तब्येतीविषयक काही समस्या जाणवतील. विमा एजंट, सर्जन, ज्योतिषी यांना मात्र हाच काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस ग्रहमानात सुधारणा होईल. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. योग्य आहार व नियमित व्यायाम करत राहिल्यास चांगले आरोग्य राखण्यास मदत होईल. याच्या उलट वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना व वकिलांना काळ चांगला आहे. या दरम्यान कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कुठे करीत आहात तसेच त्यात काही धोके तर नाहीत ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह अखेर जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा.
या सप्ताहासाठी उपासना: गणपती उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात बुध ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यायला हवी. सप्ताह अखेरीस उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून अष्टमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, दशमस्थानात सूर्य, शुक्र, लाभस्थानात बुध, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्तहाच्या शेवटी काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहे. या काळात आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू शकतील. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकिल यांना मात्र हा काळ चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभाचे योग आहेत. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. शेअर्स, कमोडीटीसारख्या व्यवहारातून फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र तज्ञांचा सल्ला घेऊनच व्यवहार करावेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात बुध, आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहेत. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, साहित्यिक, प्रकाशक, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. प्रवास फायदेशीर ठरु शकतील. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची मदत मिळेल. काहींना पॉपर्टीच्या विक्रीपासून लाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात बुध आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न करणार्या काही घटना शक्य आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात काहींना धनलाभ होण्याचे योग आहेत. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. भाग्यवर्धक घटना शक्य. धार्मिक गोष्टींसाठीही हा कालावधी चांगला आहे. मात्र डोळ्यांची व दातांची या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. सप्ताहाचा शेवट कलाकार/ कवी यांना चांगला आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोग शक्य. भावंडांशी वार्तालाप होईल.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. काही अचानक खर्चही या काळात उद्भवू शकतात. आयात-निर्यात करणार्यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात उगीचच काही गोष्टींची चिंता मनाला लागून राहील. बेकायदा गोष्टींपासून या काळात लांबच राहीलेले बरे. सप्ताह अखेरीस मित्रमंडळी/ आवडत्या लोकांची भेट होऊ शकेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. एखादा धनलाभ सुखवून टाकेल. तुमच्या राशिचे लोक खरे खवय्ये असतात. नवनवीन पदार्थ बनविणे आणि त्याचा आस्वाद घेणे तुम्हाला आवडते. एखादा छान पदार्थ या काळात करुन बघायला हरकत नाही.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २१ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग व गुरुचा शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्र व शनिची युती होईल. २५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २६ सूर्याचा मंगळाशी व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याची शक्यता आहे. ऒळखीच्या व्यक्तीकडून एखादं अडलेलं काम होऊ शकेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. उपासना करण्यार्यांना चांगला काळ आहे. काहींना परदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्यांना हा काळ खूप चांगला आहे. विशेषत: वैद्यकीय उपकरणे किंवा औषधांची आयात-निर्यात करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. बेकायदा व्यवहार मात्र या काळात टाळा. सप्ताह अखेरीस मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. नशीबाची साथ मिळेल. लोकांच्या कौतुकास पात्र व्हाल. काही लाभ होतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)