अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ जुलै ते १३ जुलै २०२४)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व बुधाशी युती होईल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ चांगला व्यतीत होईल. घरात छान वातावरण असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताहाच्या मध्यात तुमच्यातील कल्पनाशक्तीला वाव मिळेल. लेखक, साहित्यिक, प्रकाशक, विद्यार्थी व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र त्यासाठी जास्त मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी कायदेविषयक कामांसाठी अनुकूल काळ आहे. नोकरी करणार्‍यांना काही नवीन संधी मिळू शकतील. मात्र या काळात तुमच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी बुध, शुक्र, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. काहीतरी छान काम होईल. सप्ताह मध्यात लाभ देणारं ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. इस्टेट एजंट व बांधकाम व्यावसायिक यांना या काळात चांगला फायदा होण्याची शक्याता आहे. आपल्या छंदाला वेळ द्यायचा असेल किंवा एखादा नवीन विषय शिकायचा असेल तर त्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ संभवतो. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानी बुध, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वेळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडीलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. साहित्यिक/ लेखकांचं कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस संततीची प्रगती मनाला आनंद देणारी ठरेल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना हा कालावधी उत्तम आहे. एखादा धनलाभ प्रलंबित असेल तर त्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, शुक्र, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सप्ताह मध्यात कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांवर मस्त ताव माराल. मात्र खाण्यापिण्यावर थोडा संयम या काळात बाळगायला हवा तसेच डोळ्यांची व दातांची काळजी या काळात घ्यावी. खर्चही वाढतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. मनात विनाकारण कोणत्यातरी चिंता येत रहातील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना मात्र उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात चांगलं काम होईल. त्यापासून काही लाभही होतील. त्यामुळे खुषीत असाल. घरातही प्रसन्न वातावरण असेल. मित्र किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटी मनाला आनंद देतील. धनलाभ होतील. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. आज केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात बुध, शुक्र ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात काही खर्च अचानक सामोरे येतील. परदेशाशी ज्यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींसाठीही काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट छान जाणार आहे. धनलाभ होतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना विशेषत: गायकांना हा काळ अतिशय चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने ते खूष असतील. सप्ताह मध्यात ग्रहांची अनुकूलता अजूनच वाढणार आहे. काहींचा मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही सतर्क रहावे असे ग्रहमान सांगत आहे. कामात केलेली कुचराई किंवा दिरंगाई नेमकी वरीष्ठांच्या नजरेत पडण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी या दरम्यान मोठी जोखीम असलेले व्यवहार शक्यतो करु नये. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मात्र एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्य़ाने त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी गुरु, हर्षल सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. मनाचा तोल जाऊ देऊ नये. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडॆल. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने खुशीत असाल. लाभदायक काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. मस्त पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगले ग्रहमान आहे. सासरकडच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. तब्येतीच्या मात्र काही कुरबुरी जाणवतील.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सामाजिक कार्य करीत असाल तर त्यातही यश मिळेल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कोणतेही काम करु नका. विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वकील, फार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. अचानक धनलाभाचे योगही काहींना शक्य.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)