अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३० जून ते ६ जुलै २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल ग्रहमान आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात धनलाभाची शक्यता आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. गायकांना काही नवीन संधी मिळू शकतील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर ब्लॉगर्स, लेखक, खेळाडू व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रवासयोगही शक्य.
या सप्ताहात करायची उपासना: श्रीसुक्ताचे पठण किंवा श्रवण या काळात भाग्याची वृध्दी करु शकेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, धनस्थानी सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी बुध, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतील. धार्मिक विचार मनात घोळत राहतील. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्या घटना घडू शकतात. घरात छान वातावरण असेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल काळ आहे. मात्र घसा व कफ याबाबत त्रास जाणवू शकतो. सप्ताहाच्या शेवटी छान मेजवानीचे योग येतील. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. आपल्या एखाद्या छंदासाठी आणि मुलांसाठी जरुर वेळ काढावा.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, शुक्र, धनस्थानी बुध, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभाची शक्यता आहे. खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशगमन ज्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात काही संधी येतील. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनु्कूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. मन आनंदी व उत्साही राहील.
या सप्ताहात करायची उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. अपेक्षित असलेले काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. काही महत्वाकांक्षा या काळात पूर्णत्वास नेऊ शकाल. सप्ताह अखेर खरेदीसाठी चांगला आहे. ज्यांचा कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही नविन संधी मिळण्याची शक्यता आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीही हा काळ चांगला आहे.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास योगही शक्य. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर काम होणार आहे वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभाची शक्यता आहे. संगणक क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या अखेरीस लाभदायक योग आहेत. मित्रांशी संपर्क होईल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात सूर्य, शुक्र आणि लाभस्थानात बुध ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताहाचे पहिले दोन दिवस वाहने जपून चालवा. कोणत्याही गोष्टीची जोखीम या अवधीत टाळलेली बरी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक ठरेल. काही लाभदायक घटना घडू शकतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. डोळ्यांच्या काही समस्या असतील तर योग्य तो वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. विम्यासंबंधीत काम करणार्यांना कालावधी चांगला आहे. अचानक धनलाभाचे योगही शक्य. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. खर्च मात्र वाढणार आहेत.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. व्यापार्यांना काळ चांगला आहे मात्र अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. या दरम्यान रागावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराशी वाद संभवतात. काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट सामान्य आहे. गूढ गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी गुरु, हर्षल सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात आपल्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र काळ अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणारे किंवा नोकरीबदल ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनाही काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
या सप्ताहात करायची उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात बुध आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाला आनंद देणार्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. मनोबल वाढविणारी घटना घडेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात काही लाभ होता होता राहून जाण्याची शक्यता आहे. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना तितकासा चांगला कालावधी नाही. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे व वकिल यांना ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्यानंतर आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. कलाकारांना चांगले यश मिळू शकेल.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात बुध, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, शुक्र व शनिशी लाभयोग तर मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती तर मंगळाचा शनिशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)