अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ जून ते १५ जून २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. मन प्रसन्न असेल. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची किंवा विकायची असेल त्यांच्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल आहे. काहींना चांगले लाभ होतील. एखादं छान बक्षिस, पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप किंवा चार कौतुकाचे शब्द मनाला नवीन उभारी देतील. प्रेमिकांनाही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीनिमित्त काहींना प्रवासयोग या काळात शक्य. तसेच तब्येतीची काळजी या काळात घेणे आवश्यक आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. कलाकार, कवी, लेखक, ब्लॉगर्स तसेच साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. याकाळात काहीतरी छान काम होण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासाचेही योग काहींना संभवतात. सप्ताह मध्य बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल आहे. घरातील वातावरण चांगले असेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. त्यामुळे आनंदी असाल. संततीसंदर्भातील एखादी छानशी घटना संभवू शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. गायकांना ग्रहमान अनुकूल आहे. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध संभाषणकौशल्याशी येतो अशा लोकांना घवघवीत यशाचा हा काळ ठरु शकेल. सप्ताह मध्यात वादग्रस्त लेखन करु नका. लोकांचे विचित्र अनुभव या काळात शक्य आहेत. शेजार्‍यांशी तसेच भावंडांशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. प्रवासातही योग्य ती काळजी घ्या. वाहनांची नियमित केलेली देखभाल उपयोगी ठरु शकेल. सप्ताह अखेरीस राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारची सकाळ प्रवासासाठी तसेच खरेदीसाठी अनुकूल आहे. त्यानंतरचे दोन दिवस उत्तम असणार आहेत. या काळात मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. खाद्यपदार्थ विक्रेते तसेच आहारतज्ञ यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस लाभ देणारे ग्रहमान आहे. लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात महादेवाची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून भाग्यस्थानात मंगळ, आणि दशमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहावे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल. वरीष्ठ खुश असतील. आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. मात्र आपली मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. आवडत्या पदार्थांवर ताव माराल. एखादा पदार्थ स्वत:ही बनवून बघायला हरकत नाही.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा गोष्टींपासून मात्र या काळात लांब रहा. कायद्याचं पालन करा. सप्ताहाचा शेवट छान जाणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदी वातावरण असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला काम करायला शारीरीक व मानसिक उर्जा ओतप्रोत भरलेली असेल. तुमच्या कार्यक्षेत्राच्या चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने तेही खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. खर्च वाढतील मात्र पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना ग्रहमान उत्तम असणार आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारची सकाळ सोडली तर संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मजेत वेळ व्यतीत करु शकाल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील.
उपासना: या काळात महादेवाची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. वाहने जपून चालवा. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक गोष्टी घडतील. न्यायसंस्था तसेच शिक्षणसंस्थेच्या संबंधीत लोकांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडॆल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनासुध्दा चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. जोखीम असलेली कामे अजिबात करु नका. वाहने जपून चालवा. विमा व्यावसायिकांना मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. मात्र नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना हाच कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराला धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कुठलेही काम करु नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून धनस्थानात मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्र-मंगळ केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल व त्यानंतर बुध मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी मनाला आनंद देणार्‍या घटनांचा काळ असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)