अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ जून ते ८ जून २०२४)
Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी अचानकपणे काही खर्च करावे लागू शकतील. पारमार्थिक उन्नतीसाठी मात्र चांगला दिवस आहे. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्य आर्थिक उत्कर्षाचा असू शकेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. गृहसौख्य लाभेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. लेखक, प्रकाशक, ब्लॉगर, युट्युबर यांना ग्रहमान अनुकूल आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची लोक प्रशंसा करतील. काहींना प्रवास योग येतील. भावंडांच्या भेटी शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. मनासारखी खरेदी होऊ शकेल. परदेशगमन करायचे असेल किंवा परदेशासंबंधीत इतर काही व्यवहार करायचे असतील तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर त्यांना आता गती मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभही शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. वरीष्ठ खुष असणार आहेत. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मित्र भॆटतील. मानसन्मान किंवा लाभही शक्य आहेत. सप्ताह मध्यात मनासारख्या खरेदीचे योग आहेत. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. परदेशासंबंधीच्या गोष्टींसाठीही अनुकूलता आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. मात्र या काळात चांगली खरेदी होऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु, शुक्र, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. उपासनेत मन लागेल. नशिबाची साथ मिळेल. नंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात व नंतर लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. घरात छान वातावरण असेल. मित्रांशी किंवा आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात मंगळ, राहू, नेपचून भाग्यस्थानात मंगळ, आणि दशमस्थानात सूर्य, गुरु शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस थोडा प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. धार्मिक गोष्टींसाठी किंवा उपासनेसाठी चांगला काळ आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. कलेच्या क्षेत्रातील लोकांना विशेष चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींशी संपर्क होईल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात मंगळ, राहू, नेपचून अष्टमस्थानात मंगळ, अशी आणि भाग्यस्थानात सूर्य, गुरु, शुक्र ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना प्रतिकूल कालावधी आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. सप्ताह मध्यात वाहने हळू चालवावीत. वाहतुकीचे नियम पाळावेत. जोखीम असलेली कामे या कालावधीत टाळलेलीच बरी. सप्ताह मध्यानंतर इंशुरन्स व वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत कार्य करणार्यांना चांगला कालावधी आहे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. सप्ताहाचा शेवट खर्च वाढवेल. आयात-निर्यातीच्या व्यवसायासाठी मात्र अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी मंगळ, राहू, नेपचून सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगला कालावधी आहे. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांनाही हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना कालावधी चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मात्र ज्य़ोतिषी, सर्जन, रेकी मास्टर, विमा प्रतिनिधी यांना हाच कालावधी चांगला असेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात मंगळ, राहू, नेपचून षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, गुरु शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना चांगला कालावधी आहे. एखादा विषय शिकायला सुरुवात करायची असेल तर किंवा आपल्या छंदात काहीतरी नव्याने करावेसे वाटत असेल तर त्यासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, नेपचून पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काळ चांगला आहे. रविवारी घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. त्यानंतरचे दोन दिवस संततीसौख्याचे आहेत. नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताह मध्यात नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. वकील, आहारतज्ञ, फ़ार्मासिस्ट, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. आरोग्याच्या काही समस्या असतील तर तिकडे मात्र दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराशी वाद संभवतात. काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. विवाहोत्सूकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य कौटुंबीक सौख्याचा आहे. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी संततीबद्दल चांगली बातमी कळेल. गुंतवणुक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी ग्रहमान चांगले आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात मंगळ, राहू, नेपचून तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींना धनलाभाची शक्यता आहे. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी झालेला संपर्क आनंददायक ठरेल. लेखकांना ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. खेळाडू तसेच कलाकार छान प्रगती करतील. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून धनस्थानात मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल याचबरोबर सूर्य व शुक्र आणि बुध व गुरु यांची युती होईल. ५ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची सूर्य व शुक्राशी युती तर शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ८ तारखेला शुक्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीचे दिवस सुखाचे ठरु शकतील. मन आनंदी राहील. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक सुयश लाभेल. मात्र बोलण्यावर संयम ठेवावा. कळत न कळत काहीतरी बोललं गेल्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. सप्ताह मध्यात नोकरीसाठी प्रवासयोग शक्य आहेत. भावंडांच्या भेटीचे योग येतील. हातून दर्जेदार लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस कौटुंबीक सौख्य लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)