अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ मे ते १ जून २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, हर्षल, धनस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात मंगळ, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्यासही हा कालावधी चांगला आहे. प्रवासयोग शक्य. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून या काळात फायदा होईल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग येऊ शकतील. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर वेळ छान जाईल. जुनी येणी वसूल होतील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना यादरम्यान चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना हा संपूर्ण सप्ताहच विशेष अनुभुतीचा ठरु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा ’जय शंकर’ या मंत्राचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात मंगळ, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात बुध, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. या काळात गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योगही काहींना याच काळात अनुभवायला मिळू शकतील. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना घडतील. न्यायाधीश, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस बर्याच काळापासून अपूर्ण राहिलेली एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत ’हनुमान चालिस’ किंवा ’मारुती स्तोत्र’ रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात मंगळ, राहू, नेपचून लाभस्थानात बुध, शुक्र, हर्षल, आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना घडेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवासात खिसे/ पाकिट सांभाळा. जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. तुमची धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात चुका होणार नाहीत तसेच कोणत्याही कारणामुळे वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची दक्षता घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात मंगळ, राहू, नेपचून दशमस्थानात बुध, हर्षल, आणि लाभस्थानात सूर्य, गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. वकील, आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना हा काळ विशेष चांगला आहे. तब्येतीच्या तक्रारी मात्र जाणवत रहातील. मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. व्यापार्यांनी मोठे धोके या काळात घेऊ नयेत. सप्ताह मध्यानंतर दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेरीस काही लाभ होतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात मंगळ, राहू, नेपचून भाग्यस्थानात बुध, हर्षल, आणि दशमस्थानात सूर्य, गुरु शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम असणार आहे. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. वाहने जपून चालवा.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात मंगळ, राहू, नेपचून अष्टमस्थानात बुध, हर्षल, अशी आणि भाग्यस्थानात सूर्य, गुरु, शुक्र ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. कर्ज प्रकरणे मंजुर होण्यासाठी कालावधी अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी मंगळ, राहू, नेपचून सप्तमस्थानात बुध, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. भावंडांची खुशाली कळेल. मात्र या काळात वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर शेअर करु नका. लोकांचे विचित्र अनुभव या दरम्यान शक्य आहेत. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. खेळाडू व विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात मात्र जोखीम असलेली कामे टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात मंगळ, राहू, नेपचून षष्ठस्थानी बुध, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, गुरु शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कौटुंबीक सौख्य मिळेल. छान मेजवानीचे योग येतील. लाभदायक घटना घडतील. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात नशीबाची साथ मिळेल. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी कराल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह अखेर संततीचे प्रश्न मार्गी लागतील. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज दत्तबावनी म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, नेपचून पंचमस्थानात बुध, हर्षल, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्त रुप देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी मंगळ, राहू, नेपचून चतुर्थस्थानात बुध, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना फायदेशीर काळ आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा या काळात शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान चांगले आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह अखेरीस धनलाभाचे योग आहेत. घरातील वातावरण छान असेल. आप्तस्वकीयांना घरी बोलावून छान पार्टी करता येईल.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत ’हनुमान चालिसा’ किंवा ’मारुती स्तोत्र’ रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात मंगळ, राहू, नेपचून तृतीयस्थानी बुध, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ मेडिटेशन यासाठी हा कालावधी चांगला आहे. पूर्वीच्या गुंतवणुकी चांगला फायदा देऊ शकतील. परदेशासंबंधीत कामांसाठी हा कालावधी चांगला असणार आहे. मात्र याच काळात काही अनावश्यक खर्चही डोके वर काढतील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ किंवा ’श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा रोज जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, नेपचून धनस्थानात बुध, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. २८ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला बुध वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची शनिशी युती व बुधाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा सूर्य, गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि हर्षल वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या किंवा परिचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परिचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी अनुकूल घटनांचा हा कालावधी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)