अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ एप्रिल ते ४ मे २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना उत्तम ग्रहमान आहे. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्यांनाही ग्रहमान अनुकूल आहे. अचानक लाभ होतील. काहींना प्रवासयोग येतील. सप्ताह मध्यात अनुकूल काळ आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नोकरीत चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूश असतील. काहींना बढतीचे योग या काळात शक्य आहेत. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र असेल. शारिरीक कुरबुरी जाणवू शकतील. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. कुठलाही शारिरीक त्रास असल्यास अंगावर काढू नका. वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही काहींना शक्य आहेत. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरतील. वक्ते, लेखक, पुरोहीत, शिक्षक यांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. तुमच्या कामाची पावती लोकांकडून मिळणार आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून आणि लाभस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना शक्य आहे. प्रेमी जीवांना हा कालावधी चांगला आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. मित्र-मैत्रिणींच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. महत्त्वाची कामे पुढे ढकला. जोखीम असलेली कामे टाळा आणि वाहने सावकाश चालवा. याउलट काहींना याच काळात अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून आणि दशमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह प्रतिकूल आहे. सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: मधूमेह असणार्यांनी पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळावे. या सप्ताहात हितशत्रूंवर लक्ष ठेवा. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कशात करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्या. आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात आणि नंतर सप्ताह अखेरपर्यंत जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. भागीदारीतील व्यावसायिकांनी व्यवहार पारदर्शक ठेवावे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. या काळात वाहने सावकाश चालवा. जोखीम असलेली कामे टाळा. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना मात्र काळ अनुकूल ठरणार आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुलांबाबत एखादी चांगली घटना शक्य आहे. विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला कालावधी आहे. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी नीट सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य कलाकार, विद्यार्थी व खेळाडूंना प्रतिकूल असेल. प्रेमिकांनी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. संततीचे काही प्रश्न असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या. शेअर मार्केटसारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात काळजीपूर्वक व्यवहार करावेत. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. वातूळ पदार्थ खाणे टाळावे. वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी मंगळ, बुध, राहू, नेपचून सप्तमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह अखेरीस काहींना लाभदायक ग्रहमान आहे. संततिसौख्य लाभेल. खेळाडू व विद्यार्थ्यांना यश देणारे ग्रहमान आहे. काहींना आर्थिक लाभ शक्य. ह्रदयविकाराचा त्रास असणार्यांनी मात्र योग्य ती काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून षष्ठस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. छान मेजवानीचे योग येतील. मात्र या काळात बोलण्यावर संयम ठेवावा. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समारंभाची आहे. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी करावी लागेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून पंचमस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल, आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. संततीसौख्य लाभेल. संततीच्या बाबतीत एखादी चांगली बातमी कळू शकेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटनांची नांदी होईल. धनलाभ होतील. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्तस्वरुप देऊ शकाल. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी मंगळ, बुध, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल, आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. धार्मिक कार्यात सहभाग असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. काही लाभ होतील. सप्ताह अखेरीस ग्रहमान अनुकूल आहे. धनलाभाचे योग आहेत. घरातील वातावरण छान असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचेही योग आहेत. एखाद्या खाऊगल्लीला जरुर भेट द्या.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात मंगळ, बुध, राहू, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ ध्यानधारणा (मेडिटेशन) यासाठी हा कालावधी चांगला आहे. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे. परदेशासंबंधीत कामांसाठीही हा कालावधी चांगला आहे. मात्र आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, बुध, राहू, नेपचून, धनस्थानात सूर्य, गुरु, शुक्र, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व प्लुटोशी युती होईल. १ तारखेला गुरु वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी लाभयोग तर शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी व प्लूटोशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खूश असाल. वरिष्ठांकडून तुम्हाला अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रमैत्रिणींचा किंवा परिचितांचा सहवास लाभेल. मात्र सावध असावे. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकला. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)