अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ मार्च ते ९ मार्च २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, बुध, शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी रात्रीपर्यंचा काळ संमिश्र आहे. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र या काळात जोखीम असलेली कामे करु नका. नंतरच्या दोन दिवसात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल व सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, बुध, शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. नंतरचे दोन दिवस गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग शक्य. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन, Data Analysis इ. गोष्टींशी आहे त्यांना उत्तम ग्रहमान आहे. जुने मित्र अचानक भेटतील. वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीची असू शकते. आपल्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. तुमच्या जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम या काळात करु नका. वरीष्ठ किंवा वडीलधारी मंडळींशी या काळात वाद होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवावेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्या. वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना मात्र दिवस अनुकूल आहे. याचबरोबर नोकरीच्या शोधात असणारे लोक, शिक्षण क्षेत्रातील लोक, न्यायाधीश यांना तसेच कायदेविषयक कामांसाठी हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात व नंतर जोडीदाराची काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. नित्योपासनेत या काळात लक्ष लागणार नाही असे दिसते आहे मात्र हा काळ पुराण, अध्यात्म, ज्योतिष किंवा अन्य गूढ गोष्टींच्या अभ्यासास चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. बांधकाम व्यावसायिक तसेच इस्टेट एजंट यांना चांगल्या संधी चालून येतील. नंतरचे दोन दिवस चांगले आहेत. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. प्रवासयोग या काळात शक्य. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंत कायदा/ न्यायव्यवस्थेशी संबंधीत असणार्यांना चांगला फायदा देणारा काळ ठरु शकेल. मात्र या काळात काहींना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतील. जोडीदाराशी वाद टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, बुध, शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा/ आप्तेष्टांचा सहवास लाभेल. काही लाभ शक्य आहेत. त्यानंतरचे दोन दिवस रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्य व त्यानंतरचा कालावधी चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. एखादा कोर्स किंवा कामाशी संबंधीत काही शिक्षण घ्यायचं असेल तर ग्रहमान अनुकूल आहे. संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी आपले आरोग्य सांभाळा आणि शेअर मार्केट किंवा तत्सम बेभरवशाच्या क्षेत्रात गुंतवणूक टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, बुध, शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. कलाकार, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. अॅसिडिटी किंवा उष्णतेचे विकारही जाणवू शकतील. काळजी घ्यावी. याच काळात धनलाभ शक्य आहेत मात्र त्यासाठी थोडे जास्त कष्ट पडण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. मात्र कागदपत्रे योग्य व्यक्तीकडून तपासून घेऊनच व्यवहार करावेत.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीसुध्दा हा कालावधी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. गायक व कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह अखेर प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. वरीष्ठांची अनुकूलता राहील. साहित्यिक, लेखक, कलाकार यांना हा कालावधी चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, प्लूटो, धनस्थानात सूर्य, बुध, शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. जुनी येणी वसूल होतील. मन समाधानी असेल. सप्ताह मध्यात व नंतर अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर कामात व्यस्त असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांचे सौख्य लाभेल. तुमच्या पराक्रमात वृध्दी होईल. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. मन प्रसन्न असेल. आप्तेष्टांच्या किंवा मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. काहींना प्रवासाचे किंवा परदेशगमनाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल आहे. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. महत्वाचे व्यवहार पुढे ढकला. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शनि अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मीन राशित तर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळ व शुक्राशी तर बुधाची नेपचूनशी युती होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- छान आठवडा आहे. सप्ताहात सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ कामावर खुश असतील. काहींना धनलाभ शक्य आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासयोग आहेत. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मनासारखी खरेदी होऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)