अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, बुध, शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. काही लाभही शक्य आहेत. विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. नंतरचे दोन दिवस नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना बढती, पगारवाढ, महत्वाच्या जागेवर बदली असे चांगले अनुभव येऊ शकतील. वकील, जीम ट्रेनर, आहार तज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना फायदेशीर ग्रहमान आहे/ मात्र याच काळात सर्वांनी आपले आरोग्य सांभाळावे. तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवू शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, बुध, शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मौज मजा करण्याकडे कल असेल. नंतरचे दोन दिवस चांगले आहेत. घरात छान वातावरण असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्य संमिश्र असेल. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक क्षेत्रात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. मात्र तब्येतीला जपा. आजारपण अंगावर काढू नका. सप्ताह मध्यानंतर स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्याची साथ मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भावंडे, नातेवाईक किंवा शेजारी यांच्याबरोबर मजेत जाईल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांकडून दर्जेदार लेखन होईल. चांगला काळ आहे. नंतरचे दोन दिवस चांगले आहेत. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर संमिश्र काळ आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी मतभेद होणार नाही याची काळाजी घ्यावी. मात्र हाच काळ इतिहास, मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वैद्यक शास्त्र यांच्या अभ्यासासाठी उत्तम आहे. संशोधक, सर्जन, डेटा प्रोसेसर यांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्य सांभाळावे. अ‍ॅसिडिटी, पोटाचे, उष्णतेचे काही त्रास असतील तर त्याबाबत विशेष काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवार प्रतिकूल असू शकेल. तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. डोळयांसंबंधी काही त्रास जाणवू शकतील. तसेच या काळात सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. प्रवास करणार असाल तर योग्य ती काळजी घ्यावी. तुमच्या वाहनांची योग्य ती देखभाल करुन घ्यावी. सप्ताह मध्यात व नंतर कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सगळ्या गोष्टींमध्ये अनुकूलता जाणवेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक सुयश लाभेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताह मध्यात नोकरीच्या कामानिमित्त प्रवासयोग शक्य. योगासने, मल्लखांब यांसारख्या शारीरिक कसरती जे करतात त्यांना अनुकूल कालावधी आहे. स्पर्धा परीक्षेतही चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, बुध, शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान प्रतिकूल आहे. खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. आपले आरोग्य सांभाळा. अती दगदग टाळा. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर करायला मदत होईल. सप्ताह मध्यात छान कालावधी आहे. धनलाभाचे योग येतील. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांच्यासाठी हा कालावधी खूप चांगला आहे. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, बुध, शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. काही लाभ होतील. नंतरचे दोन दिवस खरेदीसाठी चांगले आहेत. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणूकीतून अचानक काही लाभ होऊ शकतील. अध्यात्मिक उन्नत्तीसाठी जे प्रयत्नरत आहेत त्यांना काही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य व नंतरचा काळ आनंदाचा व लाभदायक असेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखादा नवीन विषय किंवा कला शिकायला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस छान असणार आहे. वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नंतरचे दोन दिवस आवडत्या लोकांच्या भेटीचे असतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. चांगले लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह छान आहे. रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. धार्मिक गोष्टींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. भावंडांशी संपर्क साधाल. नंतरचे चार खूप दिवस चांगले आहेत. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खुष असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, प्लूटो, धनस्थानात सूर्य, बुध, शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस कंटाळवाणा किंवा अडथळ्याचा असू शकतो. प्रवासात काळजी घ्या. सोमवार ते गुरुवार काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. काही लाभही या काळात अपेक्षित आहेत. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. धनलाभ संभवतात.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल असू शकतात. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. अचानक काही गोष्टींसाठी खर्च करावा लागू शकतो. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. सप्ताह मध्यात धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. मनोरंजनाकडे मनाचा कल राहील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला मंगळाचा गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला सूर्याची बुध व शनिशी तर बुधाचीसुध्दा शनिशी युती होईल. २९ तारखेला बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला गुरुचा सूर्याशी लाभयोग व चंद्राशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्या. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. खरेदीसाठी मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्य संमिश्र असेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी मनाला आनंद देतील. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)