अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२४)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. सोमवार, मंगळवार भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवास छान फ़ायदेशीर ठरतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी व चित्रकार यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. घरात छान वातावरण असेल. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामील होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व प्रेमिकांना हा कालावधी खूप चांगला आहे. काही लाभही होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सूर जमलेला असेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. लेखक, प्रकाशक यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. सप्ताह मध्यात गायक, कलाकार व वक्त्यांना चांगला काळ आहे. तुमच्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. घराच्या सजावटीसाठी खरेदी कराल. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सूर शेवटपर्यंत कायम टिकणार आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी बोलण्यावर संयम ठेवावा. खर्च वाढतील. आरोग्याच्या काही समस्याही जाणवतील. मात्र नृत्यकलेशी संबंधितांना मात्र हा कालावधी छान जाईल. पूर्वी केलेला एखादा खर्च आता अचानक लाभ देऊन जाईल. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा. कोणालाही विनाकारण दिलेला सल्ला या काळात त्रासदायक ठरु शकेल. सप्ताह मध्यात मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. काही लाभही होतील. सप्ताहाच्य शेवटी शेजारी रहाणार्‍यांचा चांगला अनुभव येईल. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील.
या सप्ताहासाठी उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग शक्य आहेत. काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण आनंदी असेल. हातातली कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे तुमचा कल असेल. सप्ताह अखेरीस मनाविरुध्द घटना शक्य आहेत. बेकायदा व जोखीमीच्या गोष्टींपासून लांब रहा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. परदेशासंबंधी ज्यांचा व्यवसाय आहेत अशा लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताहाचा मध्य आरोग्यासाठी अनुकूल नाही. तब्येतीची काळजी घ्यावी. या काळात कोणाशीही वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागून राहील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी भाग्याची साथ मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. कलेच्या संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. काहींना धनलाभ संभवतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सोमवार व मंगळवारी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घडतील. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शक्तील. सप्ताहाच्या शेवटी जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. कलाकारांना तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे. काही लाभ मनाला आनंद देतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यां चांगला कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस विमाप्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांना अनुकूल आहेत. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सासरकडच्या लोकांबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची बहाल मर्जी असेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. धनलाभ होतील. जोडीदाराकडूनही एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. तब्येतीची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. प्रवास लाभदायक ठरु शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो, धनस्थानात सूर्य, शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस चांगला आहे. आपल्या आवडत्या माणसांबरोबर मस्त मजेत वेळ जाईल. कलाकारांना दिवस अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सर्दी/ सायनसचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात. काही विचित्र अनुभवही शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना फारसा अनुकूल नाही. कमी श्रमात जास्त यश मिळविण्याचा प्रयत्न या कालावधीत अंगाशी येऊ शकतो. काळजी घ्यावी. प्रेमिकांसाठीही प्रतिकूल काळ आहे. वादाचे प्रसंग टाळावे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या काही तक्रारी जाणवत रहातील. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, शनि अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल व बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल व शुक्राची मंगळाशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्य, बुध व शनीशी प्रतियोग होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. रविवारी प्रियजनांचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभ होतील. त्यानंतरचे दोन दिवस प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठी चांगले आहेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी शाबासकी किंवा कौतुकाची मिळालेली थाप, बक्षिस सुखावून टाकेल. धनलाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. ज्यांची कर्जप्रकरणे प्रलंबीत आहेत त्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)