अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी किंवा आवडत्या लोकांशी संपर्क होईल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. परदेशाशी कार्यक्षेत्राचा संबंध असणारे व नृत्यकलेशी संबंधित असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर मनोरंजनाकडे कल राहील. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मात्र या काळात बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबीक सौख्य मिळेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. काहींना धनलाभ शक्य आहे.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडू शकतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. गुरु/ गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मदतीमुळे काही कामे मार्गी लागू शकतील. धनलाभाचेही योग आहेत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तु संशोधक यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. सप्ताहाच्या अखेरीस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. वडीलधारी व्यक्तीशी वाद टाळावेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मात्र आपली मते दुसर्यांवर लादू नका. प्रवास या काळात करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. मन प्रसन्न असेल. खरेदीसाठीही काळ चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास शक्य. मात्र यादरम्यान तुमच्या तब्येतीला जपावे. मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही आजार असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह अखेरीस लाभदायक काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र घटना शक्य आहेत. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहा. विद्यार्थ्यांना हा काळ प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. चांगल्या यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही याची जाणीव होईल. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना मात्र चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट लाभदायक घटनांचा ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. उपासनेत मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यातही सहभाग राहील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वकील/ फिजिकल फिटनेस या क्षेत्रात काम करणार्यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. सप्ताह मध्यात लाभदायक काळ आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर प्रतिकूल घटनांचा काळ असू शकतो. या काळात वाहने हळू चालवावीत. कोणतीही जोखीम या काळात महागात पडू शकते. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. काही लाभ शक्य आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
या सप्ताहासाठी उपासना: दत्त उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना एखादं बक्षिस, भेटवस्तू, बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कर्मचार्यांचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मधूमेह किंवा पोटाचे आजार असणार्यांनी मात्र काळाजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर संमिश्र कालावधी आहे. व्यापार्यांना ग्रहमान अनुकूल असले तरी अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यातील उर्जा वाढलेली असेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. बिल्डर्स, इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. नविन विषय शिकण्यासाठी किंवा तुमच्या एखाद्या छंदाला जरुर वेळ द्या. ग्रहमानाची चांगली साथ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला आहे. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. संततिसौख्य लाभेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सप्ताह मध्यानंतर आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास या काळात शक्य. या काळात हितशत्रूंवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्याचा कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभही या काळात शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटी होऊ शकतील. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्याचा काळ आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ/ एखादी शाबासकीची मिळालेली थाप मिळाल्याने प्रसन्न असाल. प्रेमिकांना काळ उत्तम आहे. मुलांबद्दल किंवा जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात केतू, आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह मध्यानंतर घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाच्या अखेरीस एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग शक्य. खर्च वाढतील.
या सप्ताहासाठी उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असू शकेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र एखाद्या गोष्टीची काळजी वाटत राहू शकेल. सप्ताह मध्य कौटुंबिक सौख्याचा आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. पाककलेत मन रमेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यानंतर वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर करु नका. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. १२ चंद्राचा मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व मंगळाची प्लूटोशी युती होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व गुरुशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खरेदीसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. उपासनेत मन रमेल. सप्ताहाच्या मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सप्ताहाच्या मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. काही लाभ शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)