अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२४)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, बुध, दशमस्थानात सूर्य, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. कार्यक्षेत्रासंबंधी एखादा कोर्स किंवा तत्सम शिक्षण घेण्यासाठी संधी मिळतील. सप्ताह मध्य नोकरदारांसाठी चांगले आहे. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्‍यांना काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. याचबरोबर प्रवासाला जाणार असाल तर प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करू नका. काहींना सूचक स्वप्ने पडतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, बुध, भाग्यस्थानात सूर्य, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. एखादं बक्षिस किंवा मिळालेली एखादी शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील तिकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, बुध, अष्टमस्थानात सूर्य, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या भेटी होतील. प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात योग्य ती काळजी आवश्यक आहे. सोशल मिडियावर काही शेअर करतांना काळजी घ्या. वाद टाळा. बाकी ज्योतिषशास्र, अंकशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र यांच्या अभ्यासकांना उत्तम काळ आहे. सप्ताहाचा मध्य कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला आहे. घरात छान वातावरण असेल. प्रेमिकांना लग्नबंधनात अडकायचं असेल तर त्यासाठी कलावधी अनुकूल आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी, पोटाचे किंवा उष्णतेचे काही त्रास असतील तर मात्र या काळात काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, बुध, सप्तमस्थानात सूर्य, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. आपल्या रागावर या काळात नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सोशल मिडीयावर काही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला नाही. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढेच ढकला. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद टाळा. शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, बुध, षष्ठस्थानात सूर्य, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मनाविरुध्द घटनांचा ठरु शकेल. आरोग्याच्या काही समस्यासुध्दा जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस घरातील लोकांबरोबर छान जातील. व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात कामात सुयश लाभेल. प्रवासयोग आज शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. लेखक, वक्ते, ब्लॉगर्स यांना उत्तम कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, बुध, पंचमस्थानात सूर्य, प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. सोमवार, मंगळवार हा कालावधी त्रासदायक असू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. तब्येतीचीही काळजी या काळत घेणे आवश्यक आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थी, कलाकार यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, बुध, चतुर्थस्थानात सूर्य, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. घरात एखादी पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. नंतरचे दोन दिवसांत पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोग शक्य. प्रॉपर्टीच्या कामांसाठी, गृहसजावटीसाठी वेळ काढाल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग संभवतात.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, शुक्र, बुध, तृतीयस्थानी सूर्य, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटी होतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह अखेरीस तुमच्या कामात हलगर्जीपणा करु नका आणि आपली मते दुसर्‍यांवर लादू नका. पित्ताचा किंवा पोटाचा काही त्रास असेल तर काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, बुध, धनस्थानात सूर्य, प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सोमवार, मंगळवार आपल्या कामात आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक, साहित्यिक यांना खूप चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात केतू, आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र घटनांना असू शकेल. वडीलधारी मंडळींचा सहवास लाभेल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती दगदग या कालावधीत टाळावी. सोमवार दुपारनंतरचे दोन दिवस भाग्यकारक घटनांचे ठरु शकतील. काहींना धनलाभ होतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात मंगळ, शुक्र, बुध, आणि व्ययस्थानात सूर्य, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस चांगला आहे. सप्ताह मध्य संमिश्र आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना काळ अनुकूल आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचेही योग शक्य. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी खूप छान आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, दशमस्थानात मंगळ, शुक्र, बुध, लाभस्थानात सूर्य, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला गुरुचा चंद्राशी व शुक्राशी त्रिकोण, चंद्राचा शनिशी प्रतियोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शुक्राशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात चांगली होणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या आवडत्या लोकांबरोबर वेळ आनंदात जाणार आहे. काही लाभही होतील. सप्ताहाच्या मध्यात व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळा. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)