अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ जानेवारी ते २० जानेवारी २०२४) 

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

 

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग येऊ शकतील. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. परदेशाशी कार्यक्षेत्राचा संबंध असणारे व नृत्यकलेशी संबंधित असणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. मात्र दैनंदिन कामात काही अडचणी जाणवतील. काही चिंताही असतील. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबीक सौख्य मिळेल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र म्हणावे.
उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात भाग्यवृध्दी करणारे योग येतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्र व कायद्याच्या क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींचे सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर काही खर्च अचानक समोर येतील. जोखीम असलेली कामे यादरम्यान करू नका. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाच्या अखेरीस जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. मन आनंदी राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा. सोमवारी महादेवाचे दर्शन घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाचे पहिले दोन दिवस संमिश्र आहेत. कोणतीही जोखीम घेणे या काळात महागाचे ठरू शकेल. वाहने जपून चालवा. कामात कुचराई किंवा दिरंगाई होऊ देऊ नका. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण असू द्या तसेच वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे कोणतेही वर्तन या काळात टाळावे. सप्ताह मध्यात हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर आर्थिक लाभ होतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग यादरम्यान शक्य आहे. शनिवारी आरोग्याची काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला दोन दिवस तुमच्या घरात आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यानंतर सप्ताह मध्य न्यायक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन गुंतलेले असेल. सप्ताह अखेरीस चांगला काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. काही लाभ होतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी हा काळ अनुकूल आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होऊ देऊ नका. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्या. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना कालावधी फ़ारसा चांगला नाही. व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतील. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना हा कालावधी अनुकूल आहे. मात्र यादरम्यान वाहने सावकाश चालवावीत. प्रवासात सर्व प्रकारची काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट सुखद ठरु शकेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. छान लाभ होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगली ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढण्याची शक्यता आहे त्याकडे दुर्लक्ष नको. तुमच्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्यात ग्रहस्थिती संमिश्र असेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. मात्र यादरम्यान कौटुंबिक जीवनात विसंवाद संभवतो. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. सप्ताह मध्यानंतर प्रतिकूल घटनांचा काळ असू शकतो. या काळात वाहने हळू चालवावीत. कोणतीही जोखीम या काळात महागात पडू शकते. काळजी घ्यावी. शनिवारी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, बुध, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. धनलाभाचे योग येतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताह मध्यात नोकरदार लोकांसाठी चांगला कालावधी आहे मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. मधूमेह असलेल्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. मात्र काही गोष्टींची काळजी या काळात सतत जाणवत राहील.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी सूर्य, मंगळ, बुध, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चैन, मौजमजा यांनी होऊ शकेल. मन प्रसन्न असेल. घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य खेळाडू व विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. कायदा व वैद्यक शास्त्राशी निगडीत व्यावसायिकांना फायदेशीर ग्रहमान आहे. या दरम्यान तुमच्या मुलांना तुमच्या मदतीची गरज भासू शकेल. त्यांच्याशी संवाद साधा. सप्ताह मध्यानंतर आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. काळजी घेणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्याचा कालावधी आहे. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास करणार असाल तर ते लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ बुध अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अचानक काही लाभ होऊ शकतील. घरात आनंदी वातावरण असेल. लेखक, वक्ते व कवी चांगले काम झाल्याने आनंदात असतील. सप्ताह मध्यातसुध्दा छान लाभ होतील. भावंडांबरोबर किंवा आवडत्या व्यक्तींबरोबर तुमचा वेळ चांगला जाणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताह मध्यानंतर रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. शनिवारी विद्यार्थांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, मंगळ बुध आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. गृहसौख्य लाभेल. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून यादरम्यान फायदा शक्य. खरेदीसाठी्ही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग असतील. मन आनंदी असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोग या काळात शक्य. छान छान पदार्थ बनवणे तसेच वेगवेगळ्या हॉटेलला भेटी देऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेणे तुम्हाला मनस्वी आवडते. तसाच काहीसा अनुभव या काळात येणार आहे. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. घरात छान वातावरण असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, मंगळ व गुरुशी लाभयोग तर शनिशी युती होईल. १५ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग आणि चंद्राची गुरुशी युती होईल. याचबरोबर शुक्र धनु राशित प्रवेश करेल. १९ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छान खरेदी होईल. खर्चही वाढणार आहेत. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा कालावधी खूप महत्वाचा ठरणार आहे. सप्ताह मध्यात तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला तुम्हाला जाणवेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. शनिवारी तुम्हाला प्रसिध्दी मिळण्याचे योग आहेत. याचबरोबर गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे किंवा त्यांच्याशी संपर्क होण्याचे योगही शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गुरुतत्वाची सेवा करावी. (ज्यांनी दत्तगुरु/ स्वामी समर्थ/ गजानन महाराज/ साईबाबा अशा विभूतींना गुरु मानलं असेल त्यांनी या काळात त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे).
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)