अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंत तुमचा आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी संभवतील. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच कालावधी विमा व्यावसायिक व मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे. सप्ताह मध्य अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेर कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटनांची नांदी ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. कामे मार्गी लागतील. धनलाभाचेही योग आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. लाभ होतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्य संमिश्र असेल. अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल. या काळात वाहने जपून चालवावीत. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुभुतीचा ठरु शकेल. तसेच काहींना अचानक धनलाभ आनंदाचा धक्का देऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे बेत ठरवाल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हाणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. मात्र हाच काळ वैद्यकीय क्षेत्रातील लोक, वकील, जीम ट्रेनर तसेच आहारतज्ञ यांना चांगला लाभ मिळवून देईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. जोखीम असलेली कामे या काळात टाळलेलीच बरी.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस गृहसौख्याचा असणार आहे. नंतरचे दोन दिवससुध्दा चांगले असतील. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. कलाकार व खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांनाही काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. मधुमेह किंवा यकृतासंबंधी काही आजार असणार्यांनी पथ्याकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताह अखेर तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. विशेषत: जोडीदाराशी वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीचीही काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडांबद्द्ल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यात घरगुती प्रश्न सोडवण्याकडे कल असेल. भरपूर काम करावे लागल्याने आराम मिळणार नाही. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावेसे वाटेल. मुलांना काही समस्या तर नाही ना याची खातरजमा करुन घ्या. सप्ताहाच्या शेवटी अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतील. वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी बुध, शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. लाभ होतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. विवाहोत्सूक व्यक्तींना लग्न जुळून येण्यासाठी कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार फायदेशीर ठरु शकतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन प्रसन्न असेल. नंतरचे दोन दिवस आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. अविवाहितांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल.. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, धनस्थानी सूर्य, मंगळ, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. खर्चही वाढणार आहेत. अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. नंतरचे दोन दिवस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. मात्र या दरम्यान अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. मात्र या काळात बोलण्यावर संयम हवा.
तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासयोग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभही होतील. त्या नंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. दैनंदिन कामे रेंगाळतील. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. सप्ताह मध्यात काही छान अनुभव येतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात केतू, लाभस्थानात बुध, शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व प्रेमिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात मनाजोगती खरेदी होऊ शकेल. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्यांना तसेच नृत्यकलेशी संबंधितांना खूप चांगला कालावधी आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह अखेरीस आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध, शुक्र, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात व्यवसायिकांना लाभदायक काळ आहे. नोकरी करणार्यांनी वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. काही लाभही होतील. आवडत्या व्यक्तींची भेट या काळात मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या शेवटी काही अचानक खर्च करावे लागू शकतील. जोखीम असलेली कामे टाळावीत. मात्र एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, भाग्यस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात सूर्य, मंगळ, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राची शुक्राशी युती व शनिशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १० तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. याचबरोबर मंगळाचाही शनिशी लाभयोग होईल. ११ सूर्याची चंद्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. ज्यांचा संशोधनकार्याशी संबंध आहे अशा लोकांना या काळात काही लाभही होऊ शकतील. नंतरचे दोन दिवस भाग्यवृध्दीकारक असतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. काही लाभ होतील मात्र कोणाच्या तरी विचित्र वागण्याचा त्रास या दरम्यान संभवतो.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)