अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३१ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध(व), शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना एखादं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. संततीबाबत चांगली बातमी कळू शकेल. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांनाही चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घावी. सर्दी किंवा सायनसचा त्रास या काळात शक्य. वकील तसेच वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना मात्र हाच काळ चांगला असेल. नोकरीच्या शोधात असणार्यांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर जोडीदाराच्या बाबतीत चांगली बातमी कळेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध(व), शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र काळ आहे. घरातील वातावरण चांगले राहील याची काळजी घ्यावी. ज्योतिषी, विमा व्यावसायिक, मानसोपचार तज्ञ यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी अनुकूल आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. शेअर्स, कमोडिटी सारख्या गोष्टींपासून थोडाफार फायदा संभवतो. मात्र मोठी गुंतवणूक सध्या नको. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे, थेरपिस्ट, आहारतज्ञ यांना अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध(व), शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. प्रवास लाभदायक होण्याची शक्यता आहे. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. लेखक, वक्ते यांना चांगला काळ आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना विवाह ठरविण्यास अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण छान असेल. एखादी पार्टी/ समारंभाचं आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांमधे फ़ायदा संभवतो. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. कलाकार, खेळाडू, विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकूल आहे. प्रेमिकांसाठीसुध्दा अनुकूल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात बुध(व), शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात लाभदायक असेल. अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो. मात्र आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता या काळात आहे. काळजी घ्यावी. आरोग्याच्या काही समस्याही जाणवू शकतात. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. प्रवासयोग येतील. लेखक/ ब्लॉगर्स/ कवी यांना चांगला कालावधी आहे. काहींना भावंडांकडून लाभ संभवतात. सप्ताह अखेर घरगुती प्रश्नांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी कालावधी अनुकूल आहे. मात्र प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करणार असाल तर योग्य व्यक्तीचा सल्ला अगोदर जरुर घ्यावा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात बुध(व), शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात आत्मविश्वास वाढविणारी ठरेल. नविन विषय शिकायची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. मुलांचे काही प्रश्न असतील तर तिकडे जरुर लक्ष द्या. सप्ताह मध्यात तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. आरोग्याच्या काही समस्याही जाणवू शकतात. सप्ताहाच्या मध्यानंतर कहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. काहींना धनलाभ होतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी बुध(व), शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. परदेश प्रवास ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोगही शक्य. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गायक/ कलाकार यांना चांगला काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध(व), शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना प्रवासयोग शक्य. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कार्यक्षेत्रात छान काम होईल. काहींना धनलाभ संभवतो. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. परदेशाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना फ़ायदेशीर काळ आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभ शक्य. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध(व), शुक्र, धनस्थानी सूर्य, मंगळ, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. मन प्रसन्न असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काहींना कामानिमित्त प्रवासयोग येऊ शकतात. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. आप्तेष्टांच्या/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. कमिशन एजंट/ विमा प्रतिनिधी, ट्रेडर्स यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह अखेर खरेदीसाठी अनुकूल आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही हा काळा चांगला आहे. काही धनलाभ या काळात होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध(व), शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ तसेच उपासना करणार्यांसाठी हा काळ चांगला आहे. काहींना प्रवासयोग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. वरीष्ठांकडे काही मागणी करायची असेल तर हा काळ योग्य असेल. सप्ताह मध्यानंतर आवडत्या व्यक्तींच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग शक्य आहेत. खरेदीसाठीही अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात केतू, लाभस्थानात बुध(व), शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. बेकायदेशीर कामे या कालावधीत टाळावीत. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना अचानक धनलाभ सुखावतील. प्रवासाचे योगही येऊ शकतात. न्यायाधीश, पुरोहीत व शिक्षक यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस तुमच्याकडून चांगले कार्य घडेल. वरिष्ठांकडून तुमची चांगल्या कामांसाठी तुमची निवड होऊ शकेल. लाभही होतील.
या सप्ताहासाठी उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध(व), शुक्र, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. काहींना धनलाभही होऊ शकतील. भागीदारीत नव्याने व्यवसाय सुरु करायला अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. संशोधन कार्य, बॅक ओफिसचे काम कारणारे लोक, विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचार तज्ञ यांना मात्र हाच कालावधी उत्तम ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानी केतू, भाग्यस्थानात बुध(व), शुक्र, दशमस्थानात सूर्य, मंगळ, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल आणि गुरु मार्गी होईल. १ तारखेला शुक्र-शनि केंद्रयोग होईल. २ तारखेला बुध मार्गी होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. ६ चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल आहे. वकील, फिजिकल फिटनेससंबंधीत काम करणारे तसेच वैद्यकीय व्यवसाय करणार्यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीची मात्र काळजी या काळात जरुर घ्यावी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. काही लाभ या काळात आनंद देतील. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर कटकटीचा असू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. विमा, मानसोपचारतज्ञ, ज्योतिष या क्षेत्रात काम करणार्यांसाठी मात्र अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)