अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२३)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

 

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंतचा काळ लाभदायक आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. वाहने जपून चालवावीत. कोणतेही जोखीम सध्या नको. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी मात्र हाच काळ चांगला असेल. काहींना अचानक धनलाभ शक्य. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंत आरोग्याच्या समस्या जाणवत रहातील. गुप्तशत्रूंवर नजर ठेवावी. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. मात्र हा कालावधी काहींना अचानक धनलाभ देऊ शकेल तर काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट धार्मिक गॊष्टींसाठी चांगला आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात महादेवाची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सोमवार सकाळपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस मिळणे असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकूल आहेत. मात्र अ‍ॅसिडिटी/ पोटासंबंधी ज्यांना काही त्रास असतील त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्याचे दर्शन घ्यावे.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. कला/कौशल्याला वाव मिळेल. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. नित्योपासनेत लक्ष लागणे कठीण आहे. संततीशी वाद टाळावेत. मात्र हा कालावधी ज्योतिषशास्त्र, रेकी, सुजोक अशा गोष्टींच्या अभ्यासासाठी चांगला आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम बेभरवशाच्या गुंतवणूकीत सध्या पैसे नव्याने गुंतवू नका.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात उत्तम घटनांनी होऊ शकेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. लाभ होतील. सप्ताह मध्य संमिश्र आहे. वाहने जपून चालवा. रहदारीचे नियम पाळा. सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर आपल्या लिहिण्यामुळे वाद होणार नाहीत याची पुरेशी काळजी घ्या. सप्ताह अखेर मनाला दिलासा देणार्‍या घटना घडतील. विद्यार्थांना यश मिळेल मात्र थोडे कष्ट अधिक घ्यावे लागतील. नवीन गुंतवणूक करत असाल तर पुरेशी काळजी घेणे अपेक्षित आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी सूर्य, मंगळ, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
या सप्ताहासाठी उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. आत्मविश्वास वाढीला लावणारे ग्रहमान आहे. लाभ होतील. कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. प्रेमिकांना काही सुखद अनुभव या काळात येतील. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर कलाकारांना, वक्त्यांना ग्रहमान चांगले आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस प्रॉपर्टीच्या बाबतीत प्रतिकूल काळ आहे. श्वसनाचे ज्यांना त्रास आहेत त्यांनी शुक्रवार संध्याकाळनंतर पुरेशी काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. मात्र खर्चही या काळात वाढणार आहेत. घराच्या सुशोभीकरणासाठी किंवा दुरुस्तीसाठी एखादा खर्च करावा लागू शकेल. धार्मिक गोष्टींसाठी चांगलं ग्रहमान आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. नृत्यकलेशी संबंधीत असणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे काही आजार असतील तर तब्येतीला जपा. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभाचे योग येतील. कुटुंबीयांकडून चांगलं सहकार्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. लोकांचे सहकार्य मिळेल. धनलाभाचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यात संततीसाठी वेळ काढावा लागेल. खरेदीचे योग आहेत. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. प्रॉपर्टीची कामे करण्यास ग्रहांची अनुकूलता आहे. सप्ताहाच्या शेवटी डोळे किंवा दात यांच्या काही समस्या जाणवू शकतील. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्यात.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यात धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यानंतर उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढलेला असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, मंगळ, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात भरपूर व चांगले काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. ऑफ़िसच्या कामासाठी प्रवासयोग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांशी संपर्क साधाल. एखाद्या मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस अचानक काही खर्च करावे लागतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ र्‍हां र्‍हीं र्‍हौं स: सूर्याय नम:’ या मंत्राची रोज एक माळ जपावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, दशमस्थानात बुध, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-हर्षल व शुक्र-गुरु प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग व बुध-शुक्र लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्र-सुर्य व चंद्र-मंगळ युती होईल. १३ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-मंगळ लाभयोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्‍यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीची मदत किंवा मार्गदर्शन या काळात मिळू शकेल. धनलाभ अपेक्षित असतील तर त्यासाठी थोडे अधिक परीश्रम करावे लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल.
या सप्ताहासाठी उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)