अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२३)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerindia, famousastrologerinindia, topastrologerindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारी दुपारपर्यंत घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मौज-मजा करण्याकडे कल असेल. त्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंत कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना काळ खडतर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या मुलांशी वाद टाळा. ज्योतिषशास्त्रासारख्या गूढ गोष्टींच्या अभ्यासासाठी मात्र हा काळ उत्तम आहे. सप्ताह मध्य वकील, नेते, फ़ार्मासिस्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. तब्येतीची मात्र थोडी काळजी या काळात घ्यावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात. प्रेमिकांनाही छान काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवार सकाळ प्रवासासाठी अनुकूल आहे. भावंडांशी संवाद साधाल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिकांना चांगले लाभ होऊ शकतील. सप्ताह मध्यात कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना ग्रहमान चांगले आहे. प्रेमिकांना हा काळ लग्न ठरविण्यास अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांनाही चांगला काळ आहे. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होऊ शकतील. सप्ताह मध्यात काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात योग्य ती सर्व काळजी घ्यावी. अॅसिडिटी, पोटाचे काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी या दरम्यान पाळायलाच हवे. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिकांना काळ अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. मन आनंदी असेल. घरातील वातावरणही प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. कलाकारांना त्यांच्या कलेसाठी प्रशंसा ऐकायला मिळू शकेल. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्याचे दर्शन घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- अतिशय छान सप्ताह आहे. रविवार सकाळ खरेदीसाठी चांगली आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ घरगुती गोष्टींसाठी अनुकूल आहे. घरासंबंधी काही कामे प्रलंबीत असतील तर ती आता उरकून घ्या. काही भाग्यवर्धक घटनाही या दरम्यान घडू शकतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग संभवतात. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी कलाकार, लेखक व साहीत्यिक यांना ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारची सकाळ एकदम मस्त असेल. आवडती माणसं भेटतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. त्यानंतर मंगळवारपर्यंत खर्चाचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात असाल तर आपल्या चीजवस्तू सांभाळा. भावंडांची भेट शक्य आहे. सप्ताह मध्यात तुमचा आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेर मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काही धनलाभही होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी सूर्य, मंगळ, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. धनलाभ होतील. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आवडत्या लोकांच्या सहवासात रहाण्याचे योग येतील. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशी नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करीत असाल तर वरीष्ठांकडे शब्द टाकून बघायला हरकत नाही. व्यावसायिकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी शक्य आहेत. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. चैन करण्याकडे कल असेल. कलाकारांना व परदेशाशी ज्यांचा कामाचा संबंध असतो त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न असेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर दिवस छान जाईल. मन आनंदी व उत्साही राहील. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम असलेली कामे टाळा. मित्र-मैत्रिणींशी गैरसमज होऊ नये म्हणून काळजी घ्या. मात्र काही लोकांना हाच काळ अचानक धनलाभाचा ठरणार आहे. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. खर्च वाढणार आहे. परदेशात ज्यांना जायचं आहे किंवा त्यासाठी प्रयत्न सुरु असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट उत्तम असेल. मनासारखं काम घडेल. वरीष्ठ खूष असतील. एखादी चांगली संधी किंवा लाभदायक घटना यादरम्यान अचानकपणे चकित करु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, मंगळ, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. मात्र सायनस/ सर्दी अशा स्वरुपाच्या आजाराची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य आहे. लांबच्या प्रवासाचे बेत मनात घोळत राहतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ र्हां र्हीं र्हौं स: सूर्याय नम:’ या मंत्राची रोज एक माळ जपावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, दशमस्थानात बुध, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण, शुक्राशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळ व सूर्याशी लाभयोग होईल. ८ तारखेला गुरुचा बुधाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग, गुरुशी प्रतियोग आणि शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारची सकाळ छान असेल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. वडीलधारी मंडळींकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. प्रेमिकांसाठी सुखाद अनुभवाचा हा काळ आहे. नंतर मंगळवारपर्यंत नोकरीच्या शोधात असणार्यांना चांगला काळ आहे. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. फ़िजिकल फ़िटनेसच्या व वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना अनुकूल काळ आहे. मात्र तब्येतीबाबत थोडी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराकडून काही लाभ होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांना चांगला कालावधी आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
या सप्ताहासाठी उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)