अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सूर जमलेला असेल. मुलांकडून चांगली बातमी ऎकायला मिळेल. भावंडांच्या भेटीचे योग येतील. ब्लॉगर्स, कलाकार व वक्त्यांना ग्रहमान चांगले आहे. विद्यार्थ्यांनाही कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्यात संमिश्र कालावधी आहे. काही लाभ होऊ शकतील मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. थंडीपासून आपला बचाव करावा याचबरोबर या काळात बोलण्यावर संयम ठेवावा. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. मन आनंदी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक चिंता असतील. नंतर मात्र प्रश्न हळुहळु सुटतांना दिसतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. गृहसौख्य लाभेल. सप्ताह मध्यानंतर आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग शक्य आहेत. कवी, लेखक यांच्यासाठी हा कालावधी मस्त असेल. मनासारखं काव्य/ लेखन घडेल. तुमच्या उत्तम नियोजनामुळे महत्वाची कामे पार पाडाल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या भेटीचे योग येतील. खिशात पैसे भरपूर खुळखुळत असल्याने चांगली खरेदी कराल. मौज-मजा करण्याकडे कल असेल. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी का कालावधी खूप चांगला आहे. काही चांगले अनुभव या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर आरोग्य सांभाळा. हाताखालच्या कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. संभाषण कौशल्याच्या जोरावर काही कामे मार्गी लावू शकाल. काही लाभ या काळात शक्य.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात वरीष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. एखादी मागणी असेल तर त्यांच्याकडे आता शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने आनंदी असाल. आवडत्या लोकांची भेट होईल. काही लाभही होतील. सप्ताह मध्यानंतर पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. सप्ताहाच्या शेवटी दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्या कमी होतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक काळ आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सासूरवाडीच्या नातेवाईकांच्या भेटीची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. वरीष्ठ खुश असतील. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग येतील. लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, बुध, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारी वाहने जपून चालवावीत. लेखक/ ब्लॉगर्स यांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. नंतरचे दोन दिवस उपासना करण्यार्यांना चांगले आहेत. मात्र आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, धनस्थानी सूर्य, मंगळ, बुध, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. काही लाभही होऊ शकतील. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र असणार आहेत. वाहने जपून चालवा. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांच्यासाठी मात्र हा काळ अनुकूल घटनांना ठरणार आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास शक्य आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीचा काळ नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना सुसंधी देणारा ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र या काळात डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना कालावधी चांगला आहे. काही लाभही संभवतात. प्रेमिकांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. काहींना सूचक स्वप्न पडतील. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकीत करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांना छान कालावधी आहे. उपासनेसाठीही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ व केमिस्ट यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करायचा असेल तर हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदारासाठी वेळ द्या. तुमच्या मदतीची गरज त्यांना भासू शकेल. सप्ताहाचा शेवट मानसिक चिंतेचा असू शकेल.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र आणि दशमस्थानात केतू आणि लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. काही लाभही होतील. नंतरचे दोन दिवस विद्यार्थ्यांना व कलाकारांना खूप चांगले आहेत. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. तुमची एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यात जिद्द वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वैद्यकीय व्यवसायातील लोक, केमिस्ट यांना ग्रहमान अनुकूल आहे. मात्र आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या पराक्रमात वृध्दी करणारे ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. या काळात केलेले प्रवास फायदेशीर ठरु शकतील. सप्ताहाच्या मध्यात घरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. वरीष्ठांची मर्जी राहिल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्र-सूर्य व चंद्र-मंगळ प्रतियोग होईल आणि बुध धनु राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्र-बुध प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. ३० तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्र-शनि लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभ होऊ शकेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. गृहसौख्य लाभेल. उपासनेत मन रमेल. सप्ताह मध्यात भावंडांशी भेट होईल किंबा त्यांच्याशी संपर्क साधाल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोग शक्य. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या नवीन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)