अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, केतू, अष्टमस्थानात बुध, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायात किंवा नोकरीत चांगले काम झाल्याने वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ शाबासकीची एखादी थाप मिळू शकेल. सप्ताह मध्यात काही लाभ होतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. मन आनंदी असेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी कराल. जुनी येणी वसूल होतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. शनिवारी वाहने जपून चालवा.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, केतू, सप्तमस्थानात बुध, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग संभवतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासयोग येतील. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. यशाचं प्रमाण वाढल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठसुध्दा तुमच्या कामावर खुश असतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर पुन्हा धनलाभाचे योग येतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. मनोरंजनाकडे कल राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, केतू, षष्ठस्थानात बुध, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नसली तरी नंतर मात्र पूर्ण सप्ताह चांगला जाईल. सोमवार रात्रीपर्यंतचा कालावधी संमिश्र असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. या काळात वाहने सावकाश चालवावीत. मात्र याचदरम्यान काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विमा एजंट, मानसोपचारतज्ञ यांनाही अनुकूल कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर नोकरीत किंवा व्यवसायात समाधानकारक स्थिती असेल. महत्वाचे निर्णय मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी पैशांची कामे लांबू शकतील. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, केतू, पंचमस्थानात बुध, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला कोणत्याही बाबतीत गृहीत धरु नका. सर्व व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताहाच्या मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. तब्येतीविषयक काही समस्या जाणवतील. जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. विमा एजंट, सर्जन, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, केतू, चतुर्थस्थानात बुध, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला वकिल तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना काळ चांगला आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाबरोबर छान वेळ व्यतीत करु शकाल. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र किंवा तत्सम गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगला काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात सूर्य, मंगळ, केतू, तृतीयस्थानी बुध, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मात्र पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यायला हवी. सप्ताहाचा शेवट संमिश्र असणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मात्र जोडीदाराशी वाद या काळात टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, केतू, धनस्थानी बुध, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण चांगले राहील. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेशी काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकील यांना मात्र हाच काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहेत. मधूमेह असणार्‍यांनी योग्य ते पथ्यपाणी या काळात सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. सप्ताह अखेरीस लाभदायक कालावधी आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. अचानक धनलाभाचे योग शक्य. शेअर्स, कमोडीटीसारख्या व्यवहारातून फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र तज्ञांचा सल्ला घेऊनच व्यवहार करावेत.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास

सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, मंगळ, केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहेत. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्‍यांची मदत मिळेल. काहींना पॉपर्टीच्या विक्रीपासून लाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मुलांसाठी काही खरेदी कराल. ज्यांना परदेशात शिकायला जायचे आहे त्यांच्यासाठी काही अनुकूल घटना शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, मंगळ, केतू आणि लाभस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न करणार्‍या काही घटना शक्य आहेत. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक सुयश लाभेल. तुमच्यातल्या कला-कौशल्याला दाद मिळेल. मानसन्मान मिळेल. कौटुंबीक सौख्याचा हा काळ असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र डोळ्यांची व दातांची या काळात काळजी घेणे या दरम्यान गरजेचे आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. काही लाभ या काळात मनाला आनंद देतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, केतू, दशमस्थानात बुध आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. काही अचानक खर्चही या काळात उद्भवू शकतात. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलाकारांना यशाचा काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांसोबत छान जाईल. संभाषण कौशल्याच्या जोरावर एखाद्या कामात यश मिळेल. मित्रमंडळी/ आवडत्या लोकांची भेट होऊ शकेल. एखादा धनलाभ सुखवून टाकेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, केतू, भाग्यस्थानात बुध, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची गुरुशी युती आणि मंगळ-शनि केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या किंवा नातेवाईंकाच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्राकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून अडलेलं एखादं काम होऊ शकेल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. उपासना करण्यार्‍यांनाही चांगला काळ आहे. काहींना परदेशातून लाभ शक्य. आयात-निर्यात करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. विशेषत: वैद्यकीय उपकरणे किंवा औषधांची आयात-निर्यात करणार्‍यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)