अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मात्र यादरम्यान वाहने जपून चालविणे आवश्यक आहे. ज्यांच्या पत्रिकेत अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना यादरम्यान पैसा/ जमीन किंवा इतर मार्गांनी अचानकपणे काही लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. आर्थिक लाभसुध्दा शक्य आहेत. एखाद्या स्त्रीमुळे कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवासयोग संभवतात. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे काळजीत असाल. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. अ‍ॅसिडिटी/ पोटाचे काही त्रास असतील तर या काळात योग्य ते पथ्यपाणी सांभाळणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. सप्ताह मध्यानंतर तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फलादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा कालावधी उत्तम असणार आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग येईल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. त्यानंतरचे दोन दिवस गायकांना व नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना खुप चांगले आहेत. काही चांगल्या संधी चालून येतील. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. मात्र खर्च या काळात वाढणार आहेत. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. एखादं बक्षिस, भेटवस्तू किंवा शाबासकीची अचानक मिळालेली थाप सुखावून टाकेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या व्यक्तींबरोबर मजेत वेळ घालवाल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी अचानक काही खर्च उद्भवतील. नव्या गुंतवणूकीला सुरुवात करायची असेल तर ही वेळ योग्य नाही. तब्येतीची काळजी या दरम्यान घ्यावी. शनिवारी पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, बुध, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. बढती किंवा पगारवाढ या काळात शक्य आहे. वरीष्ठांकडून एखादे काम करुन घ्यायचे असेल तर त्यासाठी जरुर प्रयत्न करावेत. सप्ताह मध्यात कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. थोडे जास्त काम करावे लागेल. मात्र त्याचं चीजही होईल.
सप्ताहाच्या मध्यानंतर आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. काही लाभ होतील. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोग या काळात शक्य. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थी, कलाकार व उपासक यांना चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्याता आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, बुध, केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- रविवारी कोणाशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना चांगला काळ आहे. काही लाभ होतील. एखादी छानशी पार्टी घरात आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्य विमासंबंधी काम करणारे, इतिहासकार, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांना अनुकूल कालावधी आहे. मात्र या काळात प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्या. गूढ विषयांकडे मन आकर्षित होईल. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवायाही वाढतील. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनाही कालावधी चांगला आहे. लेखक, ब्लॉगर्स, कवी, कलाकार यांना चांगल्या कामाबद्दल लोकांची पावती मिळेल. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना छान कालावधी आहे. मन आनंदी राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवट संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आराम तसेच मौज-मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रेमी युगुलांसाठी विशेष चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. नोकरीमध्ये आपल्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम होईल. कामे मार्गी लागतील. व्यावसयिकांना लाभ देणार्‍या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यात घरात छान वातावरण असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. घरात मस्त पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. एखादी स्पर्धा/ परीक्षा असेल तर त्यात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी जास्त दगदग किंवा श्रम टाळा. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर मात्र त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, केतू लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी प्रतियोग व गुरुशी युती होईल आणि बुधाची मंगळाशी युती होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. ३ तारखेला सूर्याचा गुरुशी प्रतियोग, चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि शुक्र कन्या राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद होऊ नये याचीही काळजी घ्यावी. या काळात प्रवास शक्यतो टाळावेत. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल कालावधी आहे. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश देणारे योग आहेत. संततीसौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)