अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी किंवा विकण्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. काहींना चांगले लाभ होतील. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र त्यासाठी जास्त मेहनतीची तयारी ठेवावी लागेल याचबरोबर संततीशी वाद टाळायला हवा. प्रेमिकांना हा काळ प्रतिकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र या दरम्यान अती दगदग टाळा आणि आरोग्य सांभाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात मंगळ, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासयोग येतील. भावंडांच्या भेटीचे योग शक्य. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. छान काम होईल. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीसंबंधीत कामांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. घराचे सुशोभीकरण किंवा दुरुस्ती यासाठी वेळ काढाल. एखादा नवीन विषय शिकायचा असेल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून एखाद्या छंदासाठी जरुर वेळ काढा. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. आहारतज्ञ, फ़ार्मासिस्ट व वकीलांना अनुकूल कालावधी आहे. संततीचे काही प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात मंगळ, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकेल. एखाद्या खाऊगल्लीला भेट द्याल. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडिलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. साहित्यिक/ लेखकांचं कौतुक होण्याची शक्यता आहे. संततीची प्रगती आनंद देणारी ठरेल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना हा कालावधी उत्तम आहे. एखादा धनलाभ प्रलंबित असेल तर त्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात मंगळ, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. सप्ताह मध्यात आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मात्र खाण्यापिण्यावर थोडा संयम या काळात बाळगायला हवा तसेच डोळ्यांची काळजी या काळात घ्यावी. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स तसेच टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे यांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादा धनलाभ किंवा एखादं बक्षिस, कौतुकाची एखादी अचानक मिळालेली थाप असे योग काहींना येणार आहेत. प्रेमी जीवांसाठीही अनुकूल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी मंगळ, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. मनात विनाकारण कोणत्यातरी चिंता येत रहातील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना मात्र उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात चांगलं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. त्यापासून काही लाभही होतील. घरात प्रसन्न वातावरण असेल. विद्यार्थी, उपासक व वकील यांना चांगले ग्रहमान आहे. आपल्या छंदांना जरुर वेळ द्या. नविन काही शिकायचं असेल तर त्यालाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा १ माळ जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानात मंगळ, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात काही खर्च अचानक सामोरे येतील. परदेशाशी ज्यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींसाठीही काळ चांगला आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा या काळात शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाचा शेवट छान जाणार आहे. धनलाभ होतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना विशेषत: गायकांना हा काळ अतिशय चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात ग्रहमान संमिश्र आहे. काहींचा मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. काहींना मात्र उलट अनुभव येतील. बेकायदा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तसेच वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे वर्तन होऊ देऊ नका. अचानक काही खर्चही उद्भवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असणार आहे. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मजेत वेळ व्यतीत करु शकाल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मानसन्मान मिळेल. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगलं काम घडॆल. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने खुशीत असाल. लाभदायक काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात मंगळ, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. वरीष्ठांची मर्जी राहील. मात्र या काळात तब्येतीची काळजी घ्या आणि हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. गूढ विषयांमध्ये मन रमेल. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी सूर्य, बुध, अष्टमस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग तर मंगळ-केतू केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, शुक्राशी युती व शनिशी प्रतियोग होईल आणि शुक्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी व सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटनांचा काळ असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकुल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)