अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मन प्रसन्न असेल. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात धनलाभाची शक्यता आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. गायकांना काही नवीन संधी मिळू शकतील. सप्ताह मध्यानंतर ब्लॉगर्स, लेखक, खेळाडू व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रवासयोग शक्य. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
या सप्ताहात करायची उपासना: श्रीसुक्ताचे पठण किंवा श्रवण या काळात भाग्याची वृध्दी करु शकेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतील. धार्मिक विचार मनात घोळत राहतील. सप्ताह मध्यात मन प्रसन्न करणार्या घटना घडू शकतात. घरात छान वातावरण असेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल काळ आहे. मात्र घसा व कफ याबाबत त्रास जाणवू शकतो. सप्ताहाच्या शेवटी मेजवानीचे योग येतील. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. आपल्या एखाद्या छंदासाठी आणि मुलांसाठी जरुर वेळ काढावा.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभाची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभण्याचीही शक्यता आहे. खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशगमन ज्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात काही संधी येतील. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनु्कूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. मन आनंदी व उत्साही राहील.
या सप्ताहात करायची उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. अपेक्षित असलेले काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. काही महत्वाकांक्षा या काळात पूर्णत्वास नेऊ शकाल. सप्ताह अखेर खरेदीसाठी चांगला आहे. ज्यांचा कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही नविन संधी मिळण्याची शक्यता आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीही हा काळ चांगला आहे.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी सूर्य, मंगळ, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास योगही शक्य. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर काम होणार आहे वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभाची शक्यता आहे. संगणक क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या अखेरीस लाभदायक योग आहेत. मित्रांशी संपर्क होईल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, मंगळ, धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताहाचे पहिले दोन दिवस वाहने जपून चालवा. कोणत्याही गोष्टीची जोखीम या अवधीत टाळलेली बरी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक ठरेल. काही लाभदायक घटना घडू शकतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. ज्यांच्या व्यवसायाचा संबंध परदेशाशी आहे त्यांना मात्र फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. विम्यासंबंधीत काम करणार्यांना कालावधी चांगला आहे. अचानक धनलाभाचे योगही शक्य. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. खर्च मात्र वाढणार आहेत.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य, मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाचा शेवट लाभदायक ग्रहमान आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. गूढ विषयांमध्ये मन रमेल. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान टाळा.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात आपल्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र काळ अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणारे किंवा नोकरीबदल ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनाही काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
या सप्ताहात करायची उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात बुध, नवमस्थानात सूर्य, मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाला आनंद देणार्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. सप्ताह मध्यात काही लाभ होता होता राहून जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तितकासा चांगला कालावधी नाही. कलाकार व खेळाडूंना मात्र चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे व वकिल यांना ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी बुध, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांशी वाद टाळावा. आरोग्याचीही काळजी या कालावधीत घेणे आवश्यक आहे. या काळात सोशल मिडीयावर काही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह अखेरीस संमिश्र दिवस आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानी सूर्य, मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. २ तारखेला चंद्राची गुरु व हर्षलशी युती होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि मंगळ तूळ राशित प्रवेश करेल. ५ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. मात्र वादग्रस्त होईल असं वर्तन करु नका. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
या सप्ताहात करायची उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)