अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र(व), पंचमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. लोकांचे सहकार्य मिळेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागाच्या भरात घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा त्रास दीर्घकाळपर्यंत होऊ शकेल. काळजी घ्यावी. सप्ताह मध्य व त्यानंतर ग्रहमान छान आहे. धनलाभाची शक्यता आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. ब्लॉगर्स, लेखक व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग संभवतात.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र(व), चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे. उपासनेत मन रमेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मात्र बेकायदा व्यवहार टाळा. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योग शक्य. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. मात्र घसा व कफ याबाबत त्रास जाणवू शकतो. सप्ताहाच्या शेवटी छान मेजवानीचे योग येतील. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र(व), तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- पूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभाची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभण्याचीही शक्यता आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. खिशात भरपूर पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशगमन ज्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात काही संधी येतील. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनु्कूल आहे. सप्ताहाच्या शेवटी हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. मन आनंदी व उत्साही राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र(व), धनस्थानी सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. या काळात केलेले प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही होणार आहेत. त्यामुळे खुशीत असाल. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांना विवाह ठरविण्यासाठी कालावधी अनुकूल आहे. सप्ताह अखेर खरेदीसाठी चांगली आहे. ज्यांचा कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना काही नवीन संधी चालून येतील. पारमार्थिक उन्नतीसाठीही हा काळ चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध(व), धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक काळ आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रवास लाभदायक ठरतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. परंतु तुमची धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताह मध्यात लोकांशी व्यवहार करतांना तसेच सोशल मिडियावर काही शेअर करतांना वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर काम करावं लागेल. तसेच वरीष्ठांशी जमवून घ्यावं लागेल. आवडत्या माणसांसाठी काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी छान सूर लागेल. सप्ताहाच्या अखेरीस धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी संपर्क होईल. मन प्रसन्न असेल. एखादी खूप दिवसांची इच्छा या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र(व), आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताहाचे पहिले दोन दिवस वाहने जपून चालवा. कोणत्याही गोष्टीची जोखीम या अवधीत टाळलेली बरी. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. सप्ताह मध्य भाग्यवर्धक ठरेल. काही लाभदायक घटना घडू शकतील. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. काहींवर गुरुकृपा होईल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र(व), लाभस्थानात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. आपले आरोग्य सांभाळा. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. विम्यासंबंधीत काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र(व), दशमस्थानात सूर्य, बुध(व), लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान असेल. तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. मात्र नोकरीचा शोध ज्यांचा चालू आहे त्यांना काही संधी दृष्टोत्पत्तीस येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. जोडीदाराला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. जोडीदाराला पुरेसा वेळ द्यावा. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी पारदर्शक व्यवहार ठेवावेत. छोटीशी गोष्ट्सुध्दा गैरसमजाला जन्म देऊ शकते हे लक्षात ठेवावे. सप्ताहाचा शेवट विमा व्यावसायिकांना चांगला व्यवसाय देऊ शकेल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र(व), नवमस्थानात सूर्य, बुध(व), दशमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अनुकूल ग्रहमान आहे. कमी श्रमात जास्त यश असे समीकरण असेल. संततीसौख्य मिळेल. कार्यक्षेत्रात मनासारखं काम होईल. प्रॉपर्टीच्या किंवा घरासंबंधी कामांसाठी वेळ काढावा लागेल. आपल्या छंदासाठी आज वेळ काढाल. सप्ताह मध्यात नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. वकील, आहारतज्ञ, फ़ार्मासिस्ट, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. मात्र आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. धनलाभाचेही योग आहेत. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र(व), अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), नवमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. छान बेत ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. नवीन परिचय होतील. मन आनंदी राहील. विवाहोत्सुकांसाठीही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस तब्येतीला जपावे. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. वैद्यकिय व्यवसाय करणारे व वकिल यांना ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र(व), सप्तमस्थानी सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. या काळात सोशल मिडीयावर काही शेअर करणार असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात ग्रहमान संमिश्र आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताहाच्या शेवटी ज्यांना परदेशात शिकायला जायचे आहे किंवा त्याबाबतची महिती मिळवायची आहे अशा लोकांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. कलाकारांना व विद्यार्थ्यांना यशासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. गुंतवणुकीसाठी ही वेळ फारशी अनुकूल नाही. काही दिवस थांबलेलेच बरे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र(व), षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होइल. ४ तारखेला गुरुची चंद्राशी युती तर बुधाशी त्रिकोण होईल. ६ तारखेला सूर्याची बुधाशी युती आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग तर शनिशी केंद्रयोग होइल. ८ तारखेला गुरुचा सूर्याशी त्रिकोण व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होइल. ९ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुध, सूर्य व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह उत्तम आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना काळ खूप चांगला आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)