अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र(व), पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. विशेषत: सर्दी, थंडीमुळे होणार्‍या आजारांपासून जपायला हवे. अती थंड तसेच आंबट पदार्थ यादरम्यान खाणे टाळावे. तसेच शत्रुंच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. नोकरीमध्ये आपले वरीष्ठ नाराज होणार नाहेत याचीही काळजी घ्यावी. सप्ताह मध्य खुप छान जाणार आहे. पती/ पत्नी बरोबर काही सुंदर क्षण अनुभवू शकाल. मन प्रसन्न असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर वाहने जपून चालवावीत. या काळात गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योगही शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवृध्दी होईल. उपासनेत मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र(व), चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संततीकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी व कलाकारांना खूप चांगला काळ आहे. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. फ़िजिकल फ़िटनेस/ वैद्यकीय व्यवसाय करणारे यांना मात्र हाच काळ फायदेशीर ठरणार आहे. नोकरदार मंडळींना कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना काही लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग आहेत. विमा व्यावसायिक, ज्योतिषी, इतिहासकार यांना अनुकूलता जाणवेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र(व), तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रियजनांशी संपर्क होईल. प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्य खुपच छान आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभही होतील. मानसन्मान मिळेल. खेळाडू, कलाकार यांना चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांनाही कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्यानंतर नोकरीत काही चांगल्या घडामोडी संभवतात मात्र छोट्या मोठ्या आजाराने त्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात अनुकूलता अनुभवाल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र(व), धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होईल. लेखक, ब्लॉगर्स, साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खुष असाल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण प्रसन्न असेल. आवडत्या व्यक्तींशी संपर्क होईल. जुन्या आठवणी ताज्या होतील. मित्रांच्या किंवा परीचितांच्या माध्यमातून काही कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आहारतज्ञ, कलाकार, विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या शक्य आहेत. मधुमेह असणार्‍यांनी पथ्यपाणी सांभाळावे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. वाहनांसाठी किंवा भावंडांसाठी काही खर्च या काळात करावा लागू शकेल. याउलट परदेशगमन किंवा त्यासंबंधीत कामांसाठी खूपच अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर घरातील कामांसाठी वेळ काढा. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण छान असेल. तुमच्या छंदासाठी जरुर वेळ द्या. उपासनेत मन रमेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र(व), आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाईल. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. सप्ताहाच्या सुरुवातीला दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. खरेदीसाठीसुध्दा हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. वरीष्ठांची मर्जी राहील. कलाकारांना विशेषत: गायकांना ग्रहमान उत्तम आहे. सप्ताह मध्यानंतर रागावर नियंत्रण ठेवा. वाहने जपून चालवा. ज्योतिषशास्त्र, अध्यात्म यांसारखे गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला.
या सप्ताहासाठी उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र(व), लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस पारमार्थिक उन्नतीसाठी उत्तम काळ आहे. धार्मिक गोष्टींना वेळ द्याल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. काही आनंद देणार्‍या घटना शक्य आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यानंतर संमिश्र घटनांचा ठरु शकेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र या काळात तुमच्या बोलण्यामुळे आज लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. सप्ताहाच्या शेवटी वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र(व), दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकुल आहे. आपल्या जिवलगांबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र दिवस आहे. धनलाभाचे योग आहेत. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र(व), नवमस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे. विशेषत: ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना लाभदायक काळ आहे. परदेशगमनासाठी किंवा परदेशातील व्यवहारांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचे योग येतील. गूढ विषयांमध्ये मन रमेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन रमेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताहाचा शेवट आनंद देणारा ठरु शकेल. संततीसौख्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र(व), अष्टमस्थानात सूर्य, बुध, नवमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कलाकारांना तसेच संगणकासंबंधी काम करणार्‍यांना ग्रहमान अनुकूल आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या शेवटी जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र(व), सप्तमस्थानी सूर्य, बुध, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र कालावधी आहे. काहींना मनाविरुध्द घटना शक्य आहेत. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताह मध्यात काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासयोगही संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल काळ आहे. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र(व), षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्राबरोबर लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याबरोबर लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाबरोबर लाभयोग तर गुरु व हर्षलबरोबर प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा मंगळाबरोबर लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग तर शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. व्यापार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. जोडीदाराबरोबर मात्र वाद टाळावेत. सप्ताह मध्य संमिश्र आहे. चैन करावीशी वाटेल. मानसोपचार तज्ञ, ज्योतिषी, सर्जन आणि विमा व्यावसायिकांना लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. मात्र तुमची धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. ज्यांना नवीन विषय शिकायला सुरुवात करायची आहे त्यांना ग्रहांची अनुकूलता आहे. काहींना अचानक धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टींसाठी प्रवासयोग आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)