अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ जुलै ते २९ जुलै २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात मंगळ, शुक्र(व), सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान असेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना व वकीलांना काळ अनुकूल आहे. मात्र तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. मन प्रसन्न असेल. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्यांनाही काळ चांगला आहे. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र घटना शक्य आहेत. वाहने जपून चालवा. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग याच काळात संभवतात. गूढ विषय या काळात तुम्हाला आकर्षित करतील. ज्योतिषसास्त्र, अध्यात्म, पुराण, रेकी अशा विषयांची गोडी असेल तर अभ्यास सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र(व), षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सोमवार दुपारपर्यंतचा काळ विद्यार्थी व कलाकारांना चांगला आहे. संततीकडून सुवार्ता कळतील. मानसन्मानाचे योग आहेत. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. काही लाभदायक घटना शक्य. त्यानंतरचे २/३ दिवस संमिश्र असतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढेल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. फ़िजिकल फ़िटनेस/ वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच नोकरीच्या शोधात असणार्यांना काळ चांगला आहे. मात्र या काळात हितशत्रूंवर लक्ष ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. काहींना धनलाभ शक्य.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र(व), पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग येऊ शकतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. केलेल्या श्रमाचं चीज होईल. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानी मंगळ, शुक्र(व), चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. लेखक, ब्लॉगर्स, साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खुष असाल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण प्रसन्न असेल. एखादा पार्टीचा किंवा मेजवानीचा कार्यक्रम घरात ठेवायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री करणार्या व्यावसायिकांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. संततीचे काही प्रश्न असतील तर लक्ष द्यावे लागेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, शुक्र(व), तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. आर्थिक सुयश लाभेल. मनासारखी खरेदी कराल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. व्यावसायिक कामासंबंधीत केलेले प्रवासयोग लाभदायक ठरतील. भावंडांच्या भेटीचे य़ोग येतील किंवा त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण छान असेल. पती/ पत्नीला जरुर वेळ द्यावा. आपल्या एखाद्या छंदासाठीही जरुर वेळ द्या. संततीबाबत चांगली बातमी कळेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाईल, आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. भावंडांच्या/ नातलगांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण मस्त असणार आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना ग्रहमान उत्तम आहे. सप्ताहाच्या शेवटी हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. लेखक/ खेळाडू यांना चांगला काळ आहे. सहल किंवा प्रवासासाठीही काळ चांगला आहे. मात्र प्रवासात अती साहस किंवा अती वेग टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस पारमार्थिक उन्नतीसाठी उत्तम काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काही आनंद देणार्या घटना शक्य आहेत. नशीबाची साथ मिळेल. लोकांच्या कौतुकास पात्र व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य आहे. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, नवमस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात मंगळ, शुक्र(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना मस्त धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्ठांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. आपल्या जिवलगांबरोब्रर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. ज्यांना परदेशात जायचे आहे किंवा त्यासाठी बर्याच काळापासून प्रयत्न करत असाल तर काही सकारात्मक गोष्टी समोर येतील. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. काही चिंता सतावत रहातील. दगदग कमी करा. थोडी विश्रांतीही घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध, नवमस्थानात मंगळ, शुक्र(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाईल. सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. वरीष्ठांचं तुम्हाला चांगलं सहकार्य लाभणार आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग आहेत. आवडत्या व्यक्तीच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे अचानकपणे होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी सूर्य, बुध, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहच अतिशय चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. लेखक, कलाकार, यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. मात्र हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार, डेटा अॅनालिस्ट, संशोधक, ज्योतिषी यांना खुप चांगला ठरु शकेल. सप्ताहाचा शेवट अचानक झालेल्या धनलाभाने चकीत करेल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. मात्र या काळात आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानी मंगळ, शुक्र(व), भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. काहींना मनाविरुध्द घटना शक्य आहेत. याच्या बरोबर उलट काहींना मात्र अचानक धनलाभ किंवा प्रमोशन शक्य आहेत. सप्ताह मध्यात काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासयोगही संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना धनलाभ होईल. लांबच्या प्रवासाचे योग शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र(व), अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. २५ तारखेला बुध सिंह राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २७ तारखेला बुध-शुक्र युती होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. विवाहोत्सूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना त्रासदायक व अडचणींचा असू शकतो. वाहने जपून चालवावीत. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)