अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ जुलै ते २२ जुलै २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना या काळात घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मात्र या दरम्यान आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना व कलाकारांनाही चांगले ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा नोकरी मिळविण्यासाठी खटपट करत असाल तर त्यासाठी ग्रहमानाची अनुकूलता आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह उत्तम आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. तुमच्या संभाषण कौशल्याच्या जोरावर काही कामे मार्गी लागतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखादा नवीन पदार्थ स्वत: बनवून बघायला हरकत नाही. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. लेखक, वक्ते व साहित्यिक यांना अनुकूल काळ आहे. भावंडांशी संवाद साधाल. काहींना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणारे तसेच प्रिंटिंग/ प्रकाशन क्षेत्राशी संबंधितांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादी चांगली घटना घडल्यामुळे खुश असाल. एखादा नवीन विषय किंवा एखादी कला शिकायला सुरुवात करणार असाल तर हा संपूर्ण सप्ताह अत्यंत शुभ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. एखादी पार्टी किंवा गेट-टुगेदरचं आयोजन घरात करायला हरकत नाही. धार्मिक कार्यक्रमांसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. सप्ताह अखेर घरात छान वातावरण असणार आहे. तुमच्या आत्मविश्वासाची व पराक्रमाची वृध्दी होईल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. शेजार्यांचा/ नातेवाईकांचा सुखद अनुभव येईल. कलाकार, लेखक व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. छान खरेदी होईल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आपल्या प्रियजनांबरोबर मस्त खरेदीची ठरु शकेल. मनोरंजनाकडे कल राहील. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा यादरम्यान शक्य आहे. याचबरोबर पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्या लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना या काळात शक्य आहेत. तुमची काही आवड किंवा छंद असतील तर त्यासाठी अवश्य वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहे. लेखक, ब्लॉगर्स व कलाकार यांना अनुकूल काळ आहे. भावंडांशी संपर्क होईल. चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, शुक्र, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. तुमच्या काही महत्वाकांक्षा या काळात पूर्ण हॊऊ शकतील. कुटुंबात आनंदी व उत्साही वातावरण असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. जोडीदाराला छानसं गिफ़्ट द्यायला हरकत नाही. काही अनपेक्षित खर्चही करावे लागतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्या घटना शक्य आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला आत्मविश्वासात वाढ झाल्याचं जाणवेल. कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरीष्ठ कामाचं कौतुक करतील त्यामुळे खुश असाल. पगारवाढ किंवा पाहिजे त्या ठिकाणी बदलीसाठी इच्छूक असाल तर आत्ता वरीष्ठांकडे शब्द टाकून बघायला हरकत नाही. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट सुखावून टाकेल. मित्राच्या मदतीने एखादं अडलेलं काम मर्जी लागू शकेल. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. मात्र या काळात नियम मोडून कोणतीही गोष्ट करु नका.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना मार्गातील लोकांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. गुरुजन किंवा वडीलधारी व्यक्तीचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह मध्यानंतर अचानक एखादा खर्च करावा लागू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मनोरंजनाकडे मनाचा कल राहील. सप्ताह अखेरीस बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, नवमस्थानात बुध, दशमस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा या काळात जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येतील. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस संमिश्र काळ आहे. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. या दरम्यान हितशत्रूंवर लक्ष ठेवा. नवीन गुंतवणूक सध्या तरी नको.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, नवमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराला एखादी छानशी भेटवस्तु देऊन खुश करु शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताह मध्यानंतर थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो. विमा एजंट, मानसोपचार तज्ञ, खासगी गुप्तहेर, संशोधक, इतिहासकार यांना हा काळ विशेष लाभाचा ठरु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानी बुध, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. नोकरदारांसाठी व कलाकारांसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. दूरच्या प्रवासाचे विचार मनात घोळत रहातील. मात्र आपल्या तब्येतीकडे या काळात दुर्लक्ष करु नका तसेच अती दगदग टाळलेली बरी. सप्ताह मध्य चांगला आहे. कौटुंबिक सौख्य मिळेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. काही लाभही होतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानी मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली असणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मात्र संततीशी या दरम्यान वाद टाळावेत. नवीन गुंतवणूक करतांना सावध रहाणे गरजेचे आहे. शेअर मार्केट सारख्या किंवा ज्या-ज्या क्षेत्रात जोखीम आहे अशा क्षेत्रात सध्या गुंतवणूक न केलेलीच बरी. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही संधी चालून येऊ शकतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळाचा शनिशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभात भाग घ्याल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. मानसिक सौख्य लाभेल. सप्ताह मध्य लाभदायक आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. नवी विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठीही हा काळ चागला आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. मात्र या दरम्यान तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)