अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ जुलै ते १५ जुलै २०२३)

अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ जुलै ते १५ जुलै २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र कालावधी आहे. काही खर्च अचानकपणे सामोरे येतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. याउलट काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना हा काळ उत्तम असणार आहे. खरेदीसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात संततीसौख्य लाभेल. कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर चांगले ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या उत्तम नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोग येतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. गुरुजनांचे/ वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. सोशल मिडीयाच्या माध्यामातून यश संभवेल. लेखक, प्रकाशक, ज्योतिषी यांनाही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या मध्यात खर्च वाढणार आहेत. जोडीदारासाठी काही खरेदी कराल. बेकायदा गोष्टी मात्र या काळात कटाक्षाने टाळाव्यात. याच काळात काहींना पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून अचानक फायदा शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. छान लाभ होतील. मानसन्मान मिळेल. कलाकारांना उत्तम संधी चालून येतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे. सप्ताह मध्य उत्तम असणार आहे. मनासारखे पैसे मिळतील. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. मात्र खर्चही वाढणार आहेत. परदेशाशी ज्यांचे व्यवहार आहेत त्यांना काही फायदा संभवेल. ध्यानधारणा/ मेडीटेशनने मनाला शांती मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ होण्याचे योग आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मधूमेह असणार्‍यांनी मात्र या काळात पथ्यपाणी सांभाळायला हवे. सप्ताह मध्यात चांगलं काम झाल्यामुळे खुष असाल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. काही धनलाभ अपेक्षित असतील तर ते मिळण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर लेखक, कवी, साहित्यिक यांना छान काळ आहेत. मित्रांच्या व नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, शुक्र, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र या काळात जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. प्रवासाचे योग संभवतात. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना फायदेशीर ग्रहमान आहे. वरीष्ठ तुमच्यावर या दरम्यान नवीन जबाबदारी सोपवू शकतात. हे काम तुम्हाला आनंद व सन्मान देऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक काळ आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. प्रेमिकांना लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्य संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. मात्र धार्मिक कार्यामधील सहभाग मनातील नकारात्मकता दूर करायला मदत करेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. मात्र तब्येतीची काळजी या काळात घ्यायला हवी. सप्ताह मध्य जोडीदाराबरोबर आनंदात जाणार आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना काही फायदेशीर संधी चलून येतील. सप्ताह अखेर संमिश्र असू शकेल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र या काळात वाहने जपून चालवा. जोखीम असलेले कोणतेही काम करु नका.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, नवमस्थानात बुध, दशमस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान चांगलं आहे. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मनाला सुखावून टाकेल. विद्यार्थी, कलाकार व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतात. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे काही त्रास असतील त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे. काही लाभही या काळात होतील. पगारवाढ किंवा बढती हवी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, नवमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला सुखदायक काळ आहे. घरातील लोकांचे छान सहकार्य मिळेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्यात संततिसौख्य लाभेल. काहींना आर्थिक लाभ शक्य. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक क्षेत्रात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. मात्र तब्येतीचे किरकोळ त्रास जाणवतील. सप्ताह मध्यानंतर नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे, आहारतज्ञ, वकील यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानी बुध, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. काहींना प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या चांगल्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. कागदपत्रांच्या संबंधीत काही कामे प्रलंबित असतील तर त्याच्या पूर्ततेसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात गुप्तहेर, पोलिस/ संशोधनकार्य/ Reconciliation work यांच्याशी संबंधीत लोकांना व्यस्त ठेवणारा हा काळ असेल. मात्र या काळात रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीची कामे शक्यतो या काळात नकोत. आणि वाहने सावकाश चालवावीत. सप्ताह अखेरीस कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानी मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. या काळात धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यात प्रवासयोग आहेत. आत्मविश्वास वाढेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. घरामध्ये छान उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी शनिवारी विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. संततीचे काही प्रश्न असतील तर लक्ष द्यावे लागेल. तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची हर्षलशी युती व सूर्याशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- एकंदरीतच पूर्ण सप्ताह तुम्हाला चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यार्‍या घटना संभवतात. मन आनंदी राहील. नशीबाची साथ मिळेल. लोकांच्या कौतुकास पात्र व्हाल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यही तुम्हाला अनुकूल असणार आहे. भावंडांशी संपर्क होईल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मात्र बुधवारी संध्याकाळ्पासून गुरुवारी दुपारपर्यंत सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक काळ आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा. गुरुवारी दत्तगुरंचे दर्शन अवश्य घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)