अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ जुलै ते ८ जुलै २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना घडतील. शिक्षणक्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहे. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्याकडे मनाचा कल राहील. अचानक लाभ होतील. काहींना प्रवासयोग येतील. सप्ताह मध्यात लाभदायक काळ आहे. नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूश असतील. काहींना बढतीचे योग शक्य. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र असेल. शारिरीक कुरबुरी जाणवू शकतील. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. कुठलाही शारिरीक त्रास असल्यास अंगावर काढू नका. वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, लेखक, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. आत्मविश्वास एका वेगळ्याच उंचीवर गेलेला जाणवेल.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना शक्य आहे. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. याउलट काहींना याच काळात अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. काही मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र या काळात आपली धार्मिक मते दुसर्यांवर लादू नका.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकारणात प्रगती संभवेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना हा काळ विशेष चांगला आहे. मात्र मंगळवार संध्याकाळपर्यंत आरोग्याबाबत जागृत राहावे. सप्ताह मध्यात एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मात्र जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. वरीष्ठांचं छान सहकार्य मिळेल. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुलांबाबत एखादी चांगली घटना घडेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. काही लाभदायक घटना शक्य. विद्यार्थ्यांना व शिक्षणक्षेत्रातील लोकांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात व नंतर काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी.
उपासना: या काळात ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा रोज जप करावा
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवावे. वाहने जपून चालवा. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. घरातील काही विलंबित दुरुस्ती किंवा डागडुजीची कामे करावी लागतील. सप्ताह मध्य व नंतरचा काळ संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद या दरम्यान होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. खेळाडू व विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. ह्रदयविकाराचा त्रास असणार्यांनी मात्र थोडी काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध, नवमस्थानात शुक्र, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- रविवारचा दुपारपर्यंतचा काळ अनुकूल आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नंतरचे दोन दिवस काहींना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. छान मेजवानीचे योग येतील. मात्र या दरम्यान तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा. कळत न कळत काहीतरी बोललं गेल्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समारंभाची. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी करावी लागेल.
उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात लाभदायक घटनांची नांदी होईल. धनलाभ होतील. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्त स्वरुप देऊ शकाल. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: रोज श्रीसूक्त म्हणावे. गुरुवारी दत्तगुरूंचे दर्शन अवश्य घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात संमिश्र काळ आहे. डोळे, दांत किंवा डोखेदुखी यांच्यासंबंधी काही त्रास जाणवू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह अखेरीस ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभ संभवू शकतात. घरातील वातावरण छान असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचेही योग आहेत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ ध्यानधारणा (मेडिटेशन) यासाठी हा कालावधी चांगला आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी काही अनावश्यक खर्च डोके वर काढतील. तुमच्या वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. परदेशासंबंधीत कामांसाठीसुध्दा हा कालावधी चांगला आहे.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी प्रतियोग, गुरुशी त्रिकोण तर शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा मंगळ व शुक्राशी प्रतियोग होईल. ७ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल, चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी युती होईल. ८ तारखेला बुध कर्क राशित प्रवेश करेल,
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खूश असाल. वरिष्ठांकडून आपल्याला अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. मन प्रसन्न असेल. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्य लाभदायक घटनांचा असेल. मित्रांच्या किंवा परिचितांच्या भेटी होतील. काही अडलेली कामे मित्रांच्या किंवा परिचितांमुळे सहजगत्या होऊन जातील. मन प्रसन्न करणार्या घटना या काळात शक्य आहेत. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)