अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ जून ते २४ जून २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह उत्तम आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यातल्या पराक्रमाला, कौशल्याला वाव मिळू शकेल अशा घटना घडतील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काही लाभही होतील. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी मनाला आनंद देतील. प्रवासयोगही या काळात शक्य आहेत. वकील, आहारतज्ञ, जीम ट्रेनर तसेच फ़ार्मासिस्ट या लोकांना हा काळ विशेष फायदा देणारा ठरु शकेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. घरात नातेवाईकांचं किंवा मित्रांचं गेट-टुगेदर किंवा पार्टी आयोजित करा असं जणू ग्रहमान सांगतं आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
उपासना: गणपतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याची या काळात शक्यता आहे. गायकांना यादरम्यान चांगले कार्यक्रम मिळू शकतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना अनुकूल कालावधी आहे. काहीतरी चांगलं घडल्यामुळे खुश असाल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे. एखादा विषय किंवा एखादी कला शिकायला सुरुवात करणार असाल तर अत्यंत शुभ काळ आहे.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी. रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्याचं दर्शन घ्यावं
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि लाभस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता असेल. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपासनेत मन रमवा. एखादी जबाबदारी अंगावर येऊन पडेल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्या व्यक्तींना हाच कालावधी चांगला ठरु शकेल. सप्ताह मध्यात काही लाभ होतील. घरात छान वातावरण असेल. तुमच्या आवडीच्या पदार्थांची घरात रेलचेल असेल. सप्ताह अखेर छान असणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वासाची व पराक्रमाची वृध्दी होईल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. कलाकार, लेखक व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आपल्या प्रियजनांबरोबर मस्त खरेदीची ठरु शकेल. जुनी येणी वसूल होतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे. अचानक धनलाभाचीही शक्यता आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्या लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. मित्रांच्या भेटी होतील. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. आपली काही आवड किंवा छंद असतील तर त्यासाठी अवश्य वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. खर्च वाढतील. तुमच्या टोचून किंवा व्यंगात्मक बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात बुध, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना धनलाभ संभवतात. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. तुमच्या काही अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. काही अनअपेक्षित खर्चही करावे लागतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. बेकायदा गोष्टींपासून या काळात कटाक्षाने लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्या घटना शक्य आहेत. मनोबल वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचं जाणवेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट सुखावून टाकेल. मित्राच्या मदतीने एखादं अडलेलं काम मार्गी लागू शकेल. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. मात्र या काळात नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात सूर्य आणि दशमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. मात्र प्रवासात योग्य ती काळवी घ्यावी. ज्यांचा संबंध विमा, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, संशोधनकार्य अशा विषयांशी आहे त्यांना हा कालावधी जास्त चांगला आहे. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर धनलाभाचे योग येतील. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
उपासना: गणपती उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, नवमस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवा. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घ्यायची असेल तर त्यासाठी ही वेळ योग्य नाही.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. जोडीदाराला तुमच्या मदतीची गरज भासू शकेल. सप्ताह मध्यात वैहाहिक सौख्य मिळेल. गूढ विषयांमध्ये मन रमेल. मात्र जोखीम असलेली कामे टाळा. वाहने जपून व सावकाश चालवा. विमा व्यावसायिक, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, डेटा अॅनालिस्ट व थेरपिस्ट लोकांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. छोटासा प्रवासही घडू शकेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानी मंगळ, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी काही संधी दृष्टोत्पत्तीस येण्याची शक्यता आहे. कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींनाही चांगला काळ आहे. मात्र या काळात तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. तसेच अती दगदग टाळा. चांगल्या आरोग्यासाठी नियमीत व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताह मध्य चांगला आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेरीस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा राहील. अचानक धनलाभाचे योग शक्य. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांसाठी अनुकुल कालावधी आहे. नोकरीच्या काही संधी सप्ताहाच्या शेवटीसुध्दा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम असणार आहे. संततीसौख्य मिळेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. काहींना छोटसं बक्षिस/ भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल.
सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह अखेर नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल: आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी कालावधी अनुकूल आहे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्र व सूर्याची युती होईल. १९ तारखेला गुरुचा चंद्राशी व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग तर शुक्राशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. चांगलं लेखन या काळात होऊ शकेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नविन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मात्र या काळात तब्येतीची काळजी घ्या.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)