अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ मे ते ३ जून २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, राहू, हर्षल, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबाबत चांगली बातमी कळेल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदारांसाठी चांगले आहे. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्यांच्या बाबतीत काही अनुकूल घटना शक्य आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग काहींना शक्य.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. प्रेमिकांसाठी काळ प्रतिकूल आहे. छोटे गैरसमजही नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. काळजी घ्यावी. ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे त्यांच्यासाठी मात्र काही संधी निर्माण होऊ शकतील. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराची प्रगती आनंदाचे कारण बनू शकेल. या काळात प्रवासयोगही शक्य.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि लाभस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी भावंडे, नातेवाईक किंवा शेजारी यांच्यासाठी वेळ काढावा लागेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोमवार, मंगळवार घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवाल. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांनाही ग्रहमान चांगले आहे. संततीच्या प्रगतीमुळे सुखावून जाल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अॅसिडिटी, पोटाचे किंवा उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाण्यार नाहीत याचीही काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमानाची साथ तुम्हाला लाभणार आहे. धनलाभाचे योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम होईल. त्यामुळे वरीष्ठ खूश असतील. एखादी मागणी त्यांच्याकडून मान्य करुन घेण्यासाठी ही वेळ योग्य ठरु शकेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील. त्यांच्याबरोबर वेळ मजेत जाणार आहे. घरात एखादं गेट-टुगेदर किंवा पार्टी आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. खर्च वाढतील. मनोरंजनाकडे कल राहिल. मात्र ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार व खेळाडू यांना अनुकूल स्थिती आहे. शेअर मार्केटसारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना मात्र योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. नंतरचे दोन दिवस घरातील किंवा आवडत्या लोकांबरोबर छान जातील. व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. काही लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होतील. वेळ मजेत जाईल. साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार यांच्यासाठी तर हा काळ उत्तमच आहे. काहीतरी नविन स्फ़ुरेल किंवा गवसेल. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे. घरासंबंधीत किंवा घरगुती उपकराणांच्या दुरुस्ती किंवा देखभालीसाठी अचानकपणे काही खर्च करावा लागू शकेल. या काळात बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. सोमवार, मंगळवार संमिश्र आहेत. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जोखीम असलेली कामे मात्र या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. आर्थिक सुयश लाभेल. कार्यक्षेत्रात छान काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. प्रवासयोग या काळात शक्य. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, नवमस्थानात शुक्र आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवस भाग्यवृध्दीकारक आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. अती दगदग मात्र या काळात टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही लाभदायक घटना शक्य आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह अखेरीस वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी बुध, गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. काही लाभ होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. बेकारांना किंवा ज्यांना नोकरीबदल करायचा आहे अशांना मित्र किंवा इतर कोणाच्यातरी ओळखीमुळे नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. मात्र यादरम्यान आपले आरोग्य सांभाळा आणि हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह अखेरीस आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका आणि आपली मते दुसर्यांवर लादू नका. वस्तू गहाळ होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकला.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात भाग्यवर्धक घटनांची ठरु शकेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. तुमच्या कामात आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक जीवनात चांगल्या घटना शक्य. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह अखेर बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. पारमार्थिक उन्नतीसाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र घटनांना असू शकेल. वडीलधारी मंडळींचा सहवास लाभेल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती दगदग या कालावधीत टाळावी. सोमवार, मंगळवार भाग्यकारक घटनांचे ठरु शकतील. काहींना धनलाभ होतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सुख व समाधानाची अनुभूती होईल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी बुध, गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस विमा क्षेत्रातील लोकांना अनुकूल आहेत. गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य. संशोधनकार्य, मानसशास्त्र, डेटा अॅनालिसिस किंवा रिकनसिलेशन अशा कामांशी ज्यांचा संबंध आहे त्यांना उत्तम काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. कलाकार, विद्यार्थी, खेळाडू यांना अतीशय चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तब्येतीची मात्र काळजी घ्या.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल व शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी प्रतियोग तर मंगळाचा शनिशी षडाष्टक होईल. २ तारखेला बुधाशी चंद्राचा प्रतियोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवार संमिश्र आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासयोग येतील. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतील. काळजी घ्यावी. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळा. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. या सप्ताहात वरीष्ठ तसेच लोकांच्या कौतुकाचा विषय व्हाल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)