अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२१ मे ते २७ मे २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, राहू, हर्षल, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. धनलाभाचे योग आहेत. घरात आनंदी वातावरण असेल. सोमवार व मंगळवार हे दोन दिवस नोकरी करणार्यांना अनुकूल आहेत. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग या काळात शक्य. नवीन नोकरी किंवा नोकरीबदल करायचा असेल तर हा कालावधी योग्य आहे, कोणाच्यातरी ओळखीने किंवा मध्यस्थीने कामे मार्गी लागू शकतील. बंद पडलेला व्यायाम पुन्हा सुरु करा असे ग्रहमान सांगते आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व प्रेमिकांना हा कालावधी खूप चांगला आहे. काही लाभही होण्याची शक्यता आहे. एखादं बक्षिस, भेटवस्तू / मानसन्मान सुखावून टाकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सूर जमलेला असेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. या काळात काही लाभही होण्याची शक्यता आहे. नंतरच्या दोन दिवसात संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. मात्र या दरम्यान कळत न कळत काहीतरी बोललं गेल्यामुळे कोणाचातरी गैरसमज होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. खर्चही वाढतील. कुटुंबीयांसाठी छान खरेदी होईल. सप्ताह मध्यात गायक, कलाकार व वक्त्यांना चांगला काळ आहे. आवडत्या गोष्टींसाठी जरुर वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि लाभस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी मनासारखी खरेदी होईल. उधारी वसूल होईल. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदाही शक्य. नृत्यकलेशी संबंधितांना हा कालावधी छान जाईल. नंतरचे चार दिवस धनलाभाचे आहेत. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वाद होऊ देऊ नका. वादग्रस्त लेखन यादरन्यान सोशल मिडियावर शेअर करु नका. लोकांचे विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मनाला आनंद देणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीचे योग शक्य आहेत. मित्रांकडून काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात हातातलं काम लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. काही खर्च अचानक सामोरे येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस छान कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. वरीष्ठ तुमच्यावर खूश असतील. मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. सप्ताह मध्यानंतर भावंडांच्या भेटीची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. कामे मार्गी लागतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना वरीष्ठांकडून कौतूकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. लोकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कलेच्या संबंधीत ज्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ चांगला आहे. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. काहींना धनलाभ संभवतात. आप्तेष्टांच्या भेटीगाठीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल. प्रवास योग शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, नवमस्थानात शुक्र आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. ज्योतिषी, मानसोपचार तज्ञ, विमा व्यावसायिक यांना रविवार चांगला असेल. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. परदेशी व्यवहारासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. बढती किंवा पगार वाढीसाठीही अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी बुध, गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात सर्जन, इतिहासकार, संशोधक तसेच ईंन्शूरन्ससंबंधी कामे करणार्यांना अनुकूल काळ आहे. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. लाभदायक घटना शक्य.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना काही चांगल्या संधी मिळू शकतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आर्थिक लाभ शक्य. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र जोखीम असलेली कामे या काळात करु नका. सप्ताहाच्या मध्यानंतर कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. काही लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मजेत जाणार आहे. संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र या काळात आपले आरोग्य सांभाळा. सप्ताहाच्या मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. प्रवासयोग शक्य. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी बुध, गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठीही काळ अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उत्तम आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. सप्ताहाच्या शेवटी वैहाहिक सौख्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात बुध, गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला सूर्याचा मंगळाशी तर चंद्राचा बुध व गुरुशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी प्रवासाचे योग संभवतात. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. भावंडांच्या भेटी शक्य. सोमवार व मंगळवारी घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीची कामे करणार्यांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात काही सुखद/ आंनंददायक प्रसंग घडू शकतील. धार्मिक गोष्टींसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या अखेरीस संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. प्रियजनांच्या भेटी शक्य.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)