अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३० एप्रिल ते ६ मे २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्य नोकरदारांसाठी चांगला आहे. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्यांच्या बाबतीत काही अनुकूल घटना शक्य आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाचा मध्यानंतर कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. धनलाभाचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. जोडीदाराबाबत चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करू नका. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहात जोखीम असलेली कामे टाळण्याची आणि बेकायदा गोष्टींपासून लांब राहण्याची गरज आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर होतील. घरातली शांतता बिघडणार नाही याचीही काळजी घावी. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. तुमच्या मुलांच्या काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष द्यावे लागेल. याउलट ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचे आहे त्यांना काही संधी दृष्टोत्पत्तीस येतील. या काळात केलेली अध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना चांगले यश देऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर बेकारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. आर्थिक उन्नतीसाठीही काळ चांगला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना व वकीलांना उत्तम कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडे/ नातेवाईक यांच्या भेटीची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर मस्त पार्टीचे आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ गोष्टींकडे मनाचा ऒढा राहील. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अॅसिडिटी, पोटाचे/उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांची असेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतील. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल काळ आहे. प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्यासाठी थोडे दिवस थांबायची तयारी ठेवावी. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. कष्टाशिवाय यश नाही याची जाणीव होईल. शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी. परदेशात शिकण्यासाठी जायचे आहे त्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढविणार्या घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. कार्यक्षेत्रात वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासयोगही शक्य. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात तुमच्या पराक्रमात वृध्दी होणार आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग येईल. आर्थिक सुयश लाभेल. प्रयत्नांची जोड दिल्यास एखादी अपूर्ण राहिलेली महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स यांना यशदायक काळ आहे. सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात शुक्र, आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाचा पूर्वार्ध तितकासा चांगला नाही. नंतर ग्रहमान अनुकूल होत जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीचे चार दिवस बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. वस्तू गहाळ होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. अचानक काही खर्च या दरम्यान उद्भवू शकतील. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर होतील. गुरुवार ते शनिवार हा कालावधी उत्तम असणार आहे. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभाचे योग येतील. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र आणि नवमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग शक्य आहेत. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग संभवतात. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र अष्टमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राच्या किंवा परिचिताच्या ओळखीमुळे नोकरी मिळणे किंवा अन्य अडकलेली कामे मार्गी लावू शकाल. मात्र या दरम्यान तुमच्या आरोग्याकडॆ दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह अखेरीस कामात हलगर्जीपणा करु नका. वाहने सावकाश चालवा. आपली मते दुसर्यांवर लादू नका.
उपासना: या काळात महादेवाची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे. मनासारखी खरेदी करु शकाल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानी शुक्र, षष्ठस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोखीम असलेली कामे करु नका. नृत्यकलाकार, मानसोपचार तज्ञ, ज्योतिषी, सर्जन यांना मात्र हा कालावधी चांगला जाणार आहे. अचानकपणे लाभदायक स्थिती निर्माण होऊ शकेल. काहींना भविष्यकाळातील घटनांचे संकेत स्वप्नं किंवा अन्य प्रकारे मिळण्याची शक्यता आहे. ध्यानधारणा, मेडीटेशन या काळात मनाला वेगळीच उर्जा देऊ शकतील. सप्ताह मध्य भाग्यकारक घटनांचा ठरु शकेल. प्रवासयोग येतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वैद्यकीय व्यावसायिक, जीम/ शरीर संवर्धनाशी (Body building) ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १ तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी केंद्रयोग होईल. २ तारखेला शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र असणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणाशीही वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैद्यकीय व्यावसायिक, वकील यांना मात्र या काळात फायदेशीर ग्रहमान आहे. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत कराल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)