अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
या सप्ताहात सूर्यग्रहण होत आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे वेधादी नियम पाळण्याची गरज नाही. तरीसुध्दा या सूर्यग्रहणाचा प्रत्येक राशिवर कमीजास्त प्रमाणात चांगला-वाईट परीणाम होणार आहे. शक्यतो मोठे व्यवहार या सप्ताहात न केलेले बरे.
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, राहू, हर्षल, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग येऊ शकतील. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. धार्मिक कार्यक्रमामध्ये मन रमेल. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. परदेशाशी कार्यक्षेत्राचा संबंध असणारे व नृत्यकलेशी संबंधित असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काही चिंता मनाला सतावतील. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात भाग्यवृध्दी करणारे योग येतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्र व कायद्याच्या क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींचे सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर बेकायदा व्यवहारापासून लांब रहा. काही खर्च अचानक समोर येतील. अचानक काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकेल. सप्ताहाच्या अखेरीस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाचे पहिले दोन दिवस संमिश्र आहेत. कोणतीही जोखीम घेणे या काळात महागाचे ठरू शकेल. वाहने जपून चालवा. कामात कुचराई किंवा दिरंगाई होऊ देऊ नका. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण असू द्या तसेच वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे कोणतेही वर्तन या काळात टाळावे. सप्ताह मध्यात हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. पैशांची कामे लांबू शकतील. कोणाचा तरी विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या अखेरीस खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला दोन दिवस तुमच्या घरात आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यानंतर सप्ताह मध्य न्यायक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द बदलीचे किंवा इतर त्रासदायक योग आहेत. वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाही याची या काळात दक्षता घ्यावी. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. सप्ताह अखेरीस लाभदायक काळ आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होऊ देऊ नका. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्या. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना कालावधी फ़ारसा चांगला नाही. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतात. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्यांना हा कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर वाहने सावकाश चालवावीत. प्रवासात सर्व प्रकारची काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट सुखद ठरु शकेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. छान लाभ होण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल, भाग्यस्थानात शुक्र, आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगली ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढण्याची शक्यता आहे त्याकडे दुर्लक्ष नको. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठीही कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर प्रतिकूल घटनांचा काळ असू शकतो. या काळात वाहने हळू चालवावीत. कोणतीही जोखीम या काळात महागात पडू शकते. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. काही लाभ शक्य आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
उपासना: दत्त उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी गुरु, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र आणि नवमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. काहींना धनलाभाचे योग येतील. सप्ताह मध्यात जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. नोकरदार लोकांसाठी चांगला कालावधी आहे मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जोडीदारासाठीही काही खर्च करावे लागतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी आपले व्यवहार चोख ठेवावेत. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभ होऊ शकतील. मात्र काही गोष्टींची काळजी या काळात सतत जाणवत राहील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध, राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र अष्टमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चैन, मौजमजा यांनी होऊ शकेल. मन प्रसन्न असेल. घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य खेळाडू व विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. प्रेमी युगुलांना विवाह ठरविण्यासाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. काळजी घेणे आवश्यक आहे. वाहनेही या काळात सावकाश चालवावीत. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्याचा कालावधी आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास करणार असाल तर ते लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर मुलांशी वाद टाळावेत. विद्यार्थ्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल, पंचमस्थानी शुक्र, षष्ठस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अचानक काही लाभ होऊ शकतील. घरात आनंदी वातावरण असेल. लेखक, वक्ते व कवी चांगले काम झाल्याने आनंदात असतील. सप्ताह मध्यात छान लाभ होतील. भावंडांबरोबर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ चांगला जाणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताह मध्यानंतर रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. प्रेमिकांनाही ग्रहमान छान आहे.
उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात गुरु, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छान खरेदी होईल किंवा अचानक काही खर्च करावे लागतील. प्रवासयोग येतील. परदेशगमनासाठी तयारी किंवा प्रवास यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग असतील. मन आनंदी असेल. छान छान पदार्थ बनवणे तसेच वेगवेगळ्या हॉटेलला भेटी देऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेणे आपल्याला मनस्वी आवडते. तसाच काहीसा अनुभव सप्ताह मध्यात येणार आहे. सप्ताह मध्यानंतर वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर करु नका. लोकांचे विचित्र अनुभव या काळात शक्य. प्रवासात करणार असाल तर काळजी घ्या. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. भाग्यवृध्दी करणारे योग आहेत.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध, राहू, हर्षल, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी युती होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग व सूर्याशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल आणि गुरु मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छान खरेदी होईल. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणूकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी हा कालावधी खूप महत्वाचा ठरणार आहे. मित्रांच्या भेटी होतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचेही योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. पैशांची कामे लांबण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवासयोग शक्य आहेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)