अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, राहू, हर्षल, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र कालावधी आहे. मनाविरुद्ध घटना घडू शकतात. वाहने हळू चालवावीत. विमा प्रतिनिधी, सर्जन, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा काळ चांगला आहे. ज्योतिषशास्त्र, इतिहास, अध्यात्म यामध्ये रुची वाढेल. सप्ताहाचा मध्य भाग्यवृध्दी करणारा ठरु शकेल. पारमार्थिक उन्नतीसाठी करणार्यांना हा कालावधी उत्तम आहे. लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. परदेशगमन किंवा त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश संभवते. सप्ताह मध्यानंतर कार्यक्षेत्रातील परिस्थिती अनुकूल असेल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. काही लाभही शक्य आहेत. एखाद्या मित्रामुळे किंवा ओळखीच्या व्यक्तीमुळे अडकलेले एखादे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात सूर्य, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात बुध, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. सप्ताह मध्य अचानक धनलाभाचा ठरु शकेल. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांसाठी काळ चांगला आहे. मात्र जोखीम असलेली कामे या काळात करु नका. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास प्राप्त होऊ शकेल. एखादी जबाबदारी तुमच्या अंगावर पडू शकेल. मानसन्मान वाढेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, लाभस्थानात बुध, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही आरोग्याच्या तक्रारींनी होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्यांना मात्र लाभदायक ग्रहमान आहे. आहारतज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक, वकील यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र काळ आहे. वरीष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. नित्योपासनेतही लक्ष लागणार नाही. जोखीम असलेले कोणतेही काम या काळात करू नका.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, दशमस्थानात बुध, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- या सप्ताहात संमिश्र ग्रहमान आहे. महत्वाचे निर्णय शक्यतो या सप्ताहात घेणे टाळावे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. खेळाडूंनी आपल्या क्षमतेपेक्षा शरीरावर जास्त ताण येऊ देऊ नका. अन्यथा दीर्घकाळपर्यंत त्याचे परीणाम होऊ शकतील. कोणतीही मोठी गुंतवणूक सध्या नको. शेअर्स, कमोडिटीसारख्या व्यवहारात जोखीम टाळा. प्रेमिकांनी त्यांच्या नात्यात तणाव येणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र दिवस अनुकूल आहे. नवीन नोकरीच्या काही संधी शक्य. सप्ताहाच्या शेवटी दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोडीदाराबरोबर वाद टाळावे.
उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा १ माळ जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात बुध, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्य संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीचे प्रश्न काही प्रश्न असतील तर लक्ष द्या, मात्र हाच काळ ज्योतिषशास्त्र/ रेकी यासारख्या गूढ शास्रांचा अभ्यास करण्यासाठी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात बुध, राहू, हर्षल, भाग्यस्थानात शुक्र, आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. धडाडीने कामे मार्गी लावाल. वरीष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना प्रवास योग आहेत. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसन्मान वाढेल. भावंडांच्या मदतीने काही कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना यशासाठी झगडावे लागू शकेल. शेअर मार्केट किंवा कमोडिटीसारख्या क्षेत्रात सध्या जोखीम पत्करू नका. वात रोगाची प्रवृत्ती आहे अशांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात बुध, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र आणि नवमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्य संमिश्र आहे. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. प्रवासयोग शक्य आहेत. मात्र या दरम्यान सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील वस्तूंची दुरुस्ती किंवा तत्सम गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू यांना चांगला काळ आहे. घरात आनंदी वातावरण असेल. एखादा नवीन विषय शिकायचा असेल तर त्याची सुरुवात या काळात करायला हरकात नाही.
उपासना: या कालावधीत रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, षष्ठस्थानी बुध, राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र अष्टमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाने किंवा कृतीने लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. सप्ताह मध्य तुमच्यासाठी मस्त असेल. धनलाभाचे योग आहेत. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. घरातील वातावरण चांगले राहील. चमचमीत पदार्थ खाणे तुम्हाला आवडते. घरात छानशी पार्टी करायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी लेखक, कवी, ब्लॉगर्स यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. ज्यांचा व्यवसाय फ़िरस्तीचा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, पंचमस्थानात बुध, राहू, हर्षल, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना ग्रहमान चांगले असणार आहे. परदेशाशी संबंधीत काही शिक्षण जे विद्यार्थी घेत आहेत त्यांना हा कालावधी चांगला आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र या काळात लांब रहा. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर एखादा धनलाभ होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी संपर्क होईल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात बुध, राहू, हर्षल, पंचमस्थानी शुक्र, षष्ठस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदीचे योग आहेत. पूर्वी केलेल्या कामापासून किंवा गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. नृत्यकलेशी संबंधितांना खूप चांगला कालावधी आहे. ज्यांना आपली प्रॉपर्टी विकायची आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. या काळात काहींना परदेशप्रवासाचे योग शक्य. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात सूर्य, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी बुध, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. नशीबाची चांगली साथ लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर किंवा आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाईल. एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखाल. लाभदायक काळ आहे. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. काही अनपेक्षित खर्चही या दरम्यान संभवतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे. मनोरंजनाकडे कल राहील. मात्र या कालावधीत बेकायदा गोष्टी टाळाव्या तसेच जोखीम असलेली कामे करु नका.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, नेपचून, धनस्थानात बुध, राहू, हर्षल, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला सूर्याची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १२ चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तारखेला होईल. १४ तारखेला सूर्य मेष राशित प्रवेश करेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व सूर्याशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. लाभदायक गोष्टी घडतील. काहींना धनलाभ शक्य. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)