अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ मार्च ते १ एप्रिल २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कलाकारांना त्यांच्या कलेत यशाचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स यांना काळ चांगला आहे. परदेशाशी संबंधीत कामात प्रगती होईल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. भेटवस्तु मिळू शकतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढलेला असेल. खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. काही अनावश्यक खर्चही करावे लागतील. ध्यानधारणा किंवा अन्य अध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात धनलाभ होण्याचे योग आहेत. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यानंतर लेखक व प्रकाशकांना चांगले ग्रहमान आहे. प्रवास फलदायी ठरतील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून आणि लाभस्थानात शुक्र, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान संमिश्र आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. उधारी वसूल होईल. काही खर्च अचानकपणे समोर येऊ शकतील. सप्ताहाच्या मध्यामधे तुम्ही स्वत:च्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भरपूर काम करण्याचे नियोजन असेल. थोडा वेळ स्वत:साठीही जरुर काढा. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्या. सप्ताहाच्या अखेरीस लेखक, ब्लॉगर्स, कवी व गायक यांना चांगला काळ आहे. या काळात काहींना प्रवासयोगही आहेत.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, दशमस्थानात शुक्र, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात खर्च वाढतील. काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासयोगही शक्य. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना या काळात शक्य.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकेल. व्यावसायिक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर काही अपेक्षित असलेले लाभ विनाकारण लांबण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करणे टाळा. परदेशाशी संबंधीत काही कामे मार्गी लागू शकतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी सूर्य, बुध, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, राहू, हर्षल आणि नवमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. विम्याचे किंवा आयकरसंबंधीत काम करणार्‍यांना मात्र चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या कामात चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. ज्योतिष, मानसशास्त्र हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, षष्ठस्थानी शुक्र, राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाबरोबर वाद टाळावेत. एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. तब्येतीचीही काळजी या काळात घ्यावी लागेल. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. काहींना मात्र अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. प्रवास फायदेशीर ठरणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. एखादा धनलाभ, पगारवाढ, बढती अशा सुखद धक्का देणार्‍या घटना या काळात शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, राहू, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्‍यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी सूर्य, बुध, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताहाच्या मध्यात काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. नवीन नोकरीच्या संधी शक्य आहेत. आहारतज्ञ, जीम ट्रेनर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात सूर्य, बुध, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला चांगले ग्रहमान आहे. घरात प्रसन्नता असेल. प्रॉपर्टीची कांमे करणाऱ्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. कमी कष्टात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. तुमच्या छंदासाठी वेळ जरूर काढा. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. गुंतवणूक करतांनाही पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराला लाभदायक काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, नेपचून, धनस्थानात शुक्र, राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा बुध व गुरूशी लाभयोग होईल. २८ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. ३१ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. ब्लॉगर्स, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात थोडीफ़ार गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र मोठी गुंतवणूक करायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)