अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (५ मार्च ते ११ मार्च २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात सूर्य, बुध, शनि आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. मौजमजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्य वकील, फार्मासिस्ट व वैद्यकीय क्षेत्रातील लोक यांच्यासाठी चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना काही नवीन संधी चालून येऊ शकतील. आरोग्य चांगले राहील. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. वैवाहिक सौख्य मिळेल. मनाजोगती खरेदी होऊ शकेल.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात सूर्य, बुध, शनि, लाभस्थानात गुरु, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांशी संवाद साधाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायिकांना चांगले लाभ होऊ शकतील. काहींना प्रवास योग्य शक्य आहे. प्रकाशक, लेखक, साहित्यिक, कवी यांच्यासाठी हा कालावधी विशेष फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर चांगले ग्रहमान आहे. काहींना बक्षीस, बढती, प्रशंसा किंवा मानसन्मान मिळेल. विद्यार्थी, खेळाडू व कलाकार यांच्यासाठी कमी श्रमात जास्त यशाचे योग आहेत. सप्ताहाचा शेवट नोकरदारांसाठी चांगला असेल. नोकरीत बढती किंवा चांगल्या ठिकाणी बदली होऊ शकेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शनि, दशमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या ठिकाणांना भेट द्याल. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मुड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिकांना काळ अनुकूल आहे. संपूर्ण सप्ताह धार्मिक कार्यांसाठी/ अध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शनि, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. मन आनंदी असेल. घरातील वातावरणही प्रसन्न राहील. ज्योतिषशास्त्र, अध्यात्म, रेकी किंवा अन्य गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही या काळात शक्य. सप्ताह मध्य संमिश्र आहे. भावंडांशी वाद टाळावा. सोशल मिडियावर या काळात काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. प्रवास गरजेचेच असतील तर प्रवासात योग्य ती सर्व काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शनि, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवार सकाळ खरेदीसाठी चांगली आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. त्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंतचा काळ कौटुंबीक सौख्याचा आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग संभवतात. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे. वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर शेअर करु नका. तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. मात्र काहींना सूचक स्वप्नं पडणे किंवा भविष्यातील घटनांची चाहूल लागणे असे विचित्र अनुभव या काळात शक्य.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, बुध, शनि, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारची सकाळ एकदम मस्त असेल. आवडती माणसं भेटतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत खर्चाचे प्रसंग येऊ शकतात. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बेकायदा गोष्टी यादरम्यान टाळाव्यात. सप्ताह मध्यात काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताह अखेर मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काही धनलाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, बुध, शनि, षष्ठस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. धनलाभ होतील. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आवडत्या लोकांच्या सहवासात रहाण्याचे योग येतील. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशी नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शनि, पंचमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करीत असाल तर वरीष्ठांकडे आता शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी शक्य आहेत. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. चैन करण्याकडे कल असेल. कलाकारांना व ज्यांच्या कामाचा संबंध परदेशाशी आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शनि, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. लेखक, कलाकार, कवी, सहलींचे नियोजन करणारे लोक यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात सूर्य, बुध, शनि, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवार लाभदायक आहे. आवडत्या लोकांबरोबर वेळ चांगला व्यतीत होईल. त्यानंतरचे दोन दिवस अचानक धनलाभाचे ठरु शकतील. ज्योतिषी, सर्जन तसेच विमा व्यावसायिकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणाच्यातरी मृत्यूमुळे रिकामी झालेल्या जागेवर नेमणूक किंवा पैसे मिळणे अशा विचित्र घटनांमधून लाभ शक्य आहेत. मात्र या काळात जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. कौटुंबिक सौख्य लाभेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा शेवट उत्तम असेल. मनासारखं काम घडेल. वरीष्ठ खूष असतील. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शनि, धनस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. मात्र जोखीम असलेली कामे या काळात करु नका. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. भाग्यवृध्दी होईल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शनि अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुध व शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ११ तारखेला शुक्राचा मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस छान असेल. लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. वडीलधारी मंडळींकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. नंतर मंगळवारपर्यंतचा काळ संमिश्र असेल. जुन्या गुंतवणूकीतून लाभ होतील. फ़िजिकल फ़िटनेसच्या व वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. मात्र तब्येतीबाबत थोडी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदाराबरोबरच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे या काळात खूप महत्वाचे ठरेल. सप्ताहाच्या शेवटी मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांना चांगला कालावधी आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)