अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात बुध, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, शनि आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात लाभदायक असेल. घरातील वातावरण आनंदी असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लेखक, प्रकाशक, साहित्यिक, ब्लॉगर्स, व्यापारी यांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात यश संभवते. हातातील काम लवकर संपवून आराम/ मौज-मजा करण्याकडे कल असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात बुध, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, शनि लाभस्थानात गुरु, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- पूर्ण सप्ताहात उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली असेल. कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाचा मध्यसुध्दा छान असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. त्यापासून धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यावसायिंकांना यशदायक व फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संपर्क साधाल. लेखक, साहित्यिक व ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. या काळात केलेले प्रवास फ़ायदेशीर ठरतील.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, शनि, दशमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात प्रतिकूल असू शकेल. खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर करायला मदत मिळेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना मात्र काही चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. काका किंवा एखाद्या वडीलधारी व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे कामे मार्गी लागू शकतील. सप्ताहाचा मध्य भाग्यवृद्धीचा आहे. प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल. काहींना धनलाभ होईल. कौटुंबीक सौख्य मिळेल.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, शनि, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. मनासारखी खरेदी होईल मात्र कसली तरी चिंता मनाला लागून राहिलेली असेल. खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा असेल. सप्ताहाचा शेवट चांगला असेल. मन प्रसन्न असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. मात्र याचबरोबर तुमचा अहंकारही वाढण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात बुध, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, शनि, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. रविवारी धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. व्यावसायिकांना चांगले ग्रहमान आहे. ज्यांचा व्यवसाय वडिलार्जित किंवा पारंपारिक आहे त्यांना हा काळ विशेष फायदेशीर आहे. नंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. तुमच्या कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवतील. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. सप्ताह मध्य जोडीदारासाठी चांगला आहे. ज्यांना भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनाही अनुकूल ग्रहमान आहे. विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी चांगला आहे. परदेशगमनासाठीही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात बुध, प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, शनि, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारची सकाळ प्रतिकूल असू शकते. मात्र सकाळी ११ नंतर मंगळवारी रात्रीपर्यंत ग्रहमान अनुकूल असेल. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. वादविवाद टाळा. कोर्टकचेरीच्या कामांसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे. मात्र ज्यांना नोकरीबदल करायचा असेल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करायचा असेल त्यांना हा काळ अनुकूल असेल. सप्ताहाचा शेवट लाभदायक असेल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी होतील. मन प्रसन्न असेल. काही लाभही यादरम्यान शक्य.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात बुध, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, शनि, षष्ठस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. जोडीदाराच्या काही मागण्या असतील तर जरूर विचार करा. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी भागीदाराला अंधारात ठेवून कोणतीही गोष्ट या काळात करु नये. अन्यथा त्याचे परीणाम दीर्घकालीन व नुकसान करणारे असू शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र हाच काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्य अनुकूल घटनांचा आहे. एखादं बक्षिस, कौतुकाची मिळालेली थाप तुमच्यात नविन विश्वास निर्माण करणार आहे. विद्यार्थी, कलाकार, शिक्षक व न्यायाधीश यांना अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या छंदाला जरूर वेळ द्या. प्रवासाचे बेत ठरतील. सप्ताहाचा शेवट आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवून देईल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी बुध, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, शनि, पंचमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात ग्रहमान प्रतिकूल आहे. जोखीम असलेले कामे करू नका. प्रॉपर्टीच्या कामांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मात्र हा काळ काही लोकांना भविष्यातील घटनांचा सूचक असू शकेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग शक्य. भाग्यवर्धक घटना घडतील. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, शनि, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीनी प्रतिकूल आहे. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे, फिजिकल फिटनेस क्षेत्रातील लोक, वकील तसेच फार्मासिस्ट यांना हाच कालावधी उत्तम असेल. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. लेखकांना व प्रकाशकांना कालावधी चांगला आहे. भावंडांशी संपर्क साधाल. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, प्लूटो, धनस्थानात सूर्य, शनि, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आनंदी असाल. मानसन्मानाचे योग आहेत. बक्षिस/ पगारवाढ/ बढती/ वरीष्ठांकडून मिळालेली कौतुकाची थाप किंवा अन्य प्रकारे लाभ होण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना व कलाकारांना हा काळ उत्तम आहे. एखादा धनलाभही या काळात आपल्याला होऊ शकतो. सप्ताह मध्यातही काहींना धनलाभाचे योग आहेत. नोकरी बदलण्याचे किंवा मिळण्याचे योग या काळात शक्य आहेत. कर्जप्रकरणे मंजूर होतील मात्र या दरम्यान आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अतिथंड पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शनि, धनस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. प्रवासयोग येतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना अनुकूल कालावधी आहे. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताह मध्यात कमी कष्टात जास्त पैसा मिळेल. एखादे बक्षिस किंवा मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील लोकांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात बुध, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. २७ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी लाभयोग होईल आणि बुध कुंभ राशित प्रवेश करेल. २८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २ तारखेला बुधाची शनिशी व शुक्राची गुरुशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा गुरु व शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला असणार आहे. सप्ताहाची सुरुवात आनंददायक असेल. आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रवासयोग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. एखादा धनलाभ होण्याची शक्यता आहे. लेखक व वक्त्यांना ग्रहमान चांगले आहे. भावंडांची मदत मिळेल. सप्ताह मध्यामध्ये खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे. गृहसजावटीसाठी काही खर्च करावा लागेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
VERY NICE AND VERY TRUE PREDICTIONS, I AM REGULARLY READ ABOUT IT AND FOLLOW REMEDIES, IT IS A GOOD HABIT TO MAKE RELIGIOUS REMEDIES FOR MENTAL HEALTH